लंडन : ब्रिटनमध्ये एका पबबाहेर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यास कारणीभूत ठरत आहे, त्या ठिकाणी घडलेली एक घटना. जिथं दोन महिला एकमेकींशी अशा काही भिडल्या की त्यांच्याच झालेल्या या बाचाबाचीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर रस्त्यात हाणामारी करणाऱ्या या महिलांना तिथे असणाऱ्या लोकांनी थांबण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्या कोणालाच ऐकल्या नाहीत. टीव्हीवर WWE पद्धतीची हाणामारी ज्या पद्धतीनं सुरु असते, अगदी त्याच पद्धतीनं त्या दोघी एकमेकींना दणकवत होत्या. 


हाणामारी करत असताना एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांनी कपडेही फाडण्यास सुरुवात केली. बराच वेळ हा सर्व प्रकार सुरु होता. 


कालांतराने या महिलांच्या लढण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला. असं असलं तरीही त्यांच्या लढाईमागचं कारण मात्र अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही. 


सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या पार्टीमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाले. ज्यानंतर ही शाब्दिक बाचाबाची हाणामारीपर्यंत पोहोचली. पोलिसांच्या माहितीनुसार अद्यापही या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.