Women Fight Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका सीटवरुन महिलांची तुफान मारामारी होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्या वर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा ट्रेंडिंगमध्ये आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणी कार पार्किंगमध्ये कुस्ती करताना दिसत आहेत. (viral video women clash pull each others hair high voltage drama of 6 Girl in a car parking WWE video trending now)


झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आधी दोन तरुणी एकमेकींशी वाद घालताना दिसतं आहे. त्यांचा वाद एवढ्या वाढला की, त्या एकमेकींना मारहाण करायला लागल्या. त्यानंतर या हाणामारीत अजून चार तरुणींनी उडी मारली. या सहा तरुणींची हाय व्होल्टेज ड्रामा पाहून उपस्थित लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी तिच्या झिंज्या उपटते, लाथा बुक्यांनी तिला मारताना दिसतं आहे. 


तरुणींची कुस्ती पाहून एक व्यक्ती त्यांचं भांडण थांबवण्यासाठी जातो पण त्या कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तरुणींचा हा राडा पाहून एक महिला त्यांना समजविण्यसाठी येते. खरं तर हे भांडण कुठल्या कारणावरुन आणि का होतं हे समजू शकलेलं नाही. या भांडणाचे तीन व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 



तरुणींच्या मारामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @VideosIrish नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या तरुणींचं भांडण कार पार्किंगमध्ये उपस्थितीत एका व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्याशिवाय हा व्हिडीओ परदेशातील आहे पण कुठल्या शहरातील आहे याबद्दल काही स्पष्ट समजू शकलेलं नाही.