Viral Video : सध्याच्या काळा मोबाईल हा आयुष्याचा एक भाग बनला आहे. एकेकाळी स्टेटस असणारा मोबाईल (Mobile) फोन आता दैनंदिन गरज बनला आहे. बाजारात दोन हजारापासून लाखापर्यंतचे आणि विविध कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध आहेत. पण सध्याच्या तरुण पिढीत केवळ मोबाईलच नाही तर मोबाईलचं आकर्षक कव्हरही (Mobile Cover) स्टाईल स्टेटस बनलं आहे. बाजारात मोबाईलची अनेक आकर्षक आणि रंगीबेरंगी कव्हर्स उपलब्ध आहेत. कही जणं मोबाईलसाठी आपल्याला हवं तसं खास कव्हर बनवून घेतात. आपल्या मोबाईलच्या कव्हरकडे नजरा वेधल्या जाव्यात याकडेही विशेष लक्ष दिलं जतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर
पण सोश ल मीडियावर सध्या एका अशा मोबाईल कव्हरची चर्चा आहे, ज्यात चक्क जिवंत मुंग्या फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एक महिला एका रेस्टोरेंटमध्ये बसलेली दिसतेय. ही महिला फोनवर कोणाशी तरी गप्पा मारतेय. बघताना हा व्हिडिओ सामान्य वाटत असला तरी बारकाईने बघितल्यास मोबाईलचं कव्हर अजब गजब असल्याचं जाणवतं. या कव्हरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. व्हिडिओत दिसतंय मोबाईलचं कव्हर पारद्शी असून आतमध्ये भूलभलैय्या सारखी डिझाईन बनवण्यात आली आहे. यात अनेक जिवंत किडे-मुंग्या फिरताना दिसत आहेत. 


येणारा जाणारा प्रत्येक जण मोबाईलचं कव्हर पाहून आश्चर्य व्यक्त करतोय.ही महिला मात्र मोबाईलवर आरामत गप्पा मारताना दिसतेय.  सोशल मीडियावरही हे मोबाईल कव्हर चर्चेचा विषय ठरलंय. ही महिला मात्र मोबाईलवर आरामत गप्पा मारताना दिसतेय. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @fuckjerry या नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओबरोबर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून यात महिलेच्या' मोबाईलमध्ये मुंग्यांच घर' असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by FUCKJERRY (@fuckjerry)


पेटाने घेतला आक्षेप
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता प्राणी संघटना पेटाने यावर आक्षेप घेतला आहे. पेटाने (PETA) प्रतिक्रिया व्यक्त करताना या जिवंत मुंग्या असतील तर विश्वास न बसण्यारखी गोष्ट आहे. कृपया जिवंत मुंग्यांना फोन कव्हरमधून मोकळं करावं अशी प्रतिक्रिया पेटाने दिलीय.


काही युजर्सने या महिलेवर संताप व्यक्त केला आहे. फोनवर वापरताना गरम होतो, अशात या जिवंत मुंग्यांचं काय होत असेल, हे दुर्देवी असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.