Vitamine E or C which is good for skin : उन्हाळ्यात त्वचेला UV किरणांपासून होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतो. त्यापैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण विकत घेत असलेल्या प्रोडक्ट्समध्ये एक व्हिटॅमिन सी आणि दुसरे व्हिटॅमिन ई आहे का हे पाहतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर फेस सीरमच्या स्वरूपात आपण हे वापरतो. बहुतेक लोकांना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मधील फरक आणि आपल्या त्वचेवर ते कसं काम करतात हे कळत नाही. चला तर जाणून घेऊया त्यातील फरक आणि काम करण्याची पद्धत...


व्हिटॅमिन ई चे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिटॅमिन ई प्रदूषण आणि सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यासोबत त्यात काही अँटिऑक्सिडेंट आहेत जे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि सॉफ्ट राहते तर चेहऱ्यावर ग्लो राहतो. व्हिटॅमिन ईमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत जे त्वचेवर अॅन्टी एजिंग रोखण्यास मदत करतात.


व्हिटॅमिन सी चे फायदे


व्हिटॅमिन सी शरीरात  कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते. तसेच त्वचेला सुरकुत्यांपासून न येण्यास मदत होते. सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते.


हेही वाचा : मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या Mood Swings चं कारण काय?


अधिक उपयुक्त काय आहे?


त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई दोन्ही आवश्यक आहेत. असे असले तरी, आपण हे दोन्ही व्हिटामीन असलेले प्रोडक्टस कसे वापरतोय यावर देखील रिसल्ट अवलंबून आहे.


हे कसे वापरावे?


हेल्थलाइनच्या मते, ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिनस पॉलिंग इन्स्टिट्यूटच्या संशोधनात असे आढळून आले आहे की जेव्हा ही दोन जीवनसत्त्वे एकत्रितपणे वापरली जातात तेव्हा ते त्वचेला अधिक प्रभावीपणे लाभ देतात. खरं तर, फोटोडॅमेज आणि फ्री रॅडिकल्स रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी या दोन्ही सीरमचा तुमच्या डेली रुटिनमध्ये समावेश करा. जर तुम्ही फक्त व्हिटॅमिन सी सीरम वापरत असाल तर ते व्हिटॅमिन ई वापरण्यापेक्षा बरेच नुकसान टाळण्यास मदत करते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)