मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या Mood Swings चं कारण काय?

Period Mood Swings : मासिक पाळी दरम्यान, महिलांना अनेक त्रास होतात. महिलांना पोट दुखणं, कंबर दुखणं ते पाय दुखणं अशा अनेक समस्यांना प्रत्येक महिन्याला सामना करावा लागतो. अनेकांना तर अन्न अपचनाच्या समस्या देखील होतात. इतकंच नाही तर या काळात महिलांचे मूड स्विंग्स देखील होतात. त्यामुळे अनेकदा चिडचिडपणा करतात तर कधी रडू लागतात. या काळात मूड स्विंग्स का होतात आणि त्याचे कारण काय असते हे जाणून घेऊया...

| Jun 12, 2023, 18:19 PM IST
1/7

डी-स्ट्रेस

Period Mood Swings

मासिक पाळीपूर्वी हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळे तुमचा ताणही वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही मेडिटेशन किंवा योगासनं करू शकता. त्यानं तणाव कमी करण्यास मदत होईल.

2/7

व्यायाम करा

Period Mood Swings

नियमित व्यायाम केल्यानं शरीरातील अनेक समस्या दूर होतात. मग ते मासिक पाळीतील मूड स्विंग्स असो किंवा मग मसल्स पेन.   

3/7

फायबर जास्त प्रमाणात असलेला आहार करा

Period Mood Swings

शरीरात व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हार्मोनल संतुलन देखील बिघडते. यामुळे या काळात त्रास वाढतो. 

4/7

कॅफेन आणि साखर

Period Mood Swings

या काळात कॉफी आणि साखरेचे पदार्थ खाणे टाळा. यानं तुमच्या आहाराला हानी पोहोचू शकते. 

5/7

भरपूर पाणी प्या

Period Mood Swings

या काळात तुम्ही भरपूर पाणी प्या. जितकं जास्त पाणी तुम्ही प्याल तितक्या समस्यांपासून तुम्ही लांब रहाल. 

6/7

हर्बल टी

Period Mood Swings

कॉफी एवजी या काळात हर्बल टी घ्या 

7/7

गोड पदार्थांसाठी पर्याय

Period Mood Swings

गोड खाण्याची सवय असेल तर मनुका आणि फळं खा. (All Photo Credit : Freepik)