Trending News : दोघांनीही परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी रोमची निवड केली. दोघंही आनंदी होते. रोमला जाण्यासाठी ते दोघंही विमानतळावर आले. पण काही वेळातच होणारी वधू विमानतळावर गायब झाली. या घटनेने तरुणाला मोठा धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
ही घटना ब्रिटनमधली आहे. ब्रिटनमध्ये राहाणाऱ्या या तरुणाची एका तरुणीबरोबर ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची एंगजेमेंटही झाली आणि लग्न करण्यासाठी त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी रोमची निवड केली.


ठरलेल्या दिवशी रोमला जाण्यासाठी दोघंही हिथ्रो विमानतळावर आले. दोघंही विमानतळावर विमानाची वाट पहात होते. यादरम्यान तरुण वॉशरुमला जाण्यासाठी उठला, जाताना त्याने सर्व सामान होणाऱ्या पत्नीकडे दिलं आणि तो वॉशरुमला गेला. पण जेव्हा परत आला तेव्हा त्याला धक्काच बसला.


ज्या ठिकाणी तो विमानाची वाट बघत बसला होता त्या ठिकाणी पत्नीही नव्हती आणि सामानही नव्हतं. ती मुलगी सर्व सामान घेऊन गायब झाली होती. लग्नासाठी तरुणाने 5 लाख रुपये तिच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. 


या घटनेने तरुणाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ त्या मुलीचा शोध सुरु केला, पण ती हाती लागली नाही. मुलगी विमानतळाबाहेर गेली की दुसऱ्या विमानाने परदेशात गेली याबाबत पोलीस शोध घेत आहेत.