ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी `मोहम्मद` नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?
World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी `मोहम्मद` नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड
World News : लहान मुलांची नावं ठेवण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा अनेक नावांना पसंती दिली जाते. अनेकदा या नावांचे अर्थही इतके कमाल असतात की नावांचं महत्त्वं वाढतं.
World News : ब्रिटीशांच्या देशात म्हणजेच इंग्लंडमध्ये आणि तेथील वेल्स प्रांतातून एक अनपेक्षित माहिती समोर आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 'द नॅशनल रिपोर्ट'च्या माहितीनुसार 2023 या वर्षात नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टीक्स (ONS) च्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये जवळपास 4661 मुलांना हेच नाव देण्यात आलं. यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 484 नं वाढला.
ONS च्या माहितीनुसार आताच नव्हे तर, 2016 पासून हे नाव पहिल्या 10 लोकप्रिय नावांमध्ये समाविष्ट असून, यंदाच्या वर्षी या नावानं नोआ (Noah) या नावाला मागे टाकत यादीत सर्वात पहिलं स्थान पटकावलं आहे. यादीत तिसरं स्थान ऑलिवर या नावाला मिळालं आहे.
ख्रिस्तधर्म वगळता 'मोहम्मद' या नावाला का मिळते इतकी पसंती?
इस्लाम धर्मातील अंतिम पैगंबरांचं नाव 'मोहम्मद' असून, इस्लाम धर्मात या नावाला अनन्यसाधारण महत्त्वं असून आदर्शस्थानी पाहिलं जातं. इंग्रजीमध्ये या नावाचे दोन अर्थ असतात आणि हे नाव दोन पद्धतींनी लिहिलं जातं. ते म्हणजे Mohammed (28 वं स्थान) आणि Mohammad (68 वं स्थान). इंग्लंड आणि वेल्समधील सर्वोत्तम 100 नावांमध्येही या दोन नावांचा समावेश आहे.
अरबी भाषेमध्ये मोहम्मद हे नाव 'हम्द' शब्दातून आलं असून, याचा अर्थ होतो प्रशंसा. इस्लाम धर्मात महत्त्वाचं असणारं हे नाव जगभरात असणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळं कमालीचं लोकप्रिय असल्याचं म्हटलं जातं.
नावांच्या या यादीमध्ये मुलींसाठी सर्वात लोकप्रिय नाव म्हणून ओलिविया या नावाला पसंती असून, मागील 8 वर्षांपासून हे नाव अग्रस्थानी असून, त्यामागोमाग अमेलिया आणि तिसऱ्या स्थानावर असला या नावांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते ब्रिटनमध्ये नाव ठेवण्याच्या एकंदर प्रक्रियेवर आणि पालकांवरही पॉप संस्कृतीचा सर्वाधित प्रभाव पाहायला मिळतो.
हेसुद्धा वाचा : Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले
थोडक्यात Pop Culture नुसार इथं मुलींना बिली (Billie), लाना (Lana), माइली (Miley), रिहाना (Rihanna) अशी नावं दिली जात आहे. तर, मुलांसाठी केन्ड्रिक (Kendrick) आणि एल्टन (Elton) या नावांना पसंती दिली जाते. फक्त पॉप कल्चरच नव्हे, तर इथं एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही त्यातील पात्रांच्या नावांप्रमाणंही बालकांना नावं दिली जातात. उदाहरणार्थ, 'बार्बी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर Margot या नावाला 215 पालकांनी पसंती दिली, तर एल्टन हे नाव 44 व्या स्थानी दिसलं.
ब्रिटनमध्ये राजघराण्याच्या नावांना एकेकाळी पसंती दिली जायची, पण आता मात्र ही आवडही बदलताना दिसत असून, जॉर्ज हे नाव चौख्या स्थानी आहे. तर, विलियम आणि लुईस ही नावं अनुक्रमे 29 आणि 45 व्या स्थानी आणि शार्लेट हे नाव 23 व्या स्थानी असल्याचं सांगितलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात ज्याप्रमाणं ऋतूंनुसार नावं ठेवली जातात, त्याचप्रमाणं इथंही वार आणि ऋतूचक्रानुसार मुलांना नावं ठेवण्याची पद्धतही प्रचलित आहे.