Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले

Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत  

सायली पाटील | Updated: Dec 7, 2024, 12:28 PM IST
Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले title=
Maharashtra assembly special session vidhansabha vishesh adhiveshan dcm ajit pawar women follower video viral

Maharashtra Assembly Special Session : विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर लागलेला निकाल ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर राज्यात सत्तास्थापना झाली आणि महायुतीचं सरकार कामाला लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यामागोमागच राज्यातील विधीमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा दिवस उजाडला आणि गाजला तो लाडक्या बहिणीच्या उत्साहामुळं आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळं.

शनिवार, 7 डिसेंबर रोजी या विशेष अधिवेशनाला मुंबईतील विधानभवनात सुरुवात झाली आणि विधानभवन परिसरामध्ये नेतेमंडळींसह अनेकांचीच लगबग पाहायला मिळाली. समर्थकांपासून नवनिर्वाचित आमदारांपर्यंत सर्वांनीच इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पण, अनोखा अंदाज पाहायला मिळाला तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा. 

कायमच अनोख्या आणि खुमासदार वक्तव्यांमुळं चर्चेत असणाऱ्या अजित पवार यांनी त्यांचं हे वेगळेपण इथंही जपलं. गुलाबी बंडी, जरीकाठाचा गुलाबी फेटा अशा एकंदर रुपात ते विधानभवनात आले आणि तिथंच पायऱ्यांवर माध्यमांसह कार्यकर्ते, समर्थकांनी आणि आमदारांनी त्यांना गराडा घातला. 

गर्दीत अजित पवार यांनी मोठ्या आपुलकीनं सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काही सांगून जात होता. तितक्यातच तिथं असणाऱ्या 'लाडक्या बहिणीनं' अर्थात एका महिला समर्थकानं मोठ्या उत्साहात आणि आपुलकीनं त्यांना एक निरोप दिला. 'दादा, प्रतिकला मुलगा झाला...' असं त्या म्हणाल्या आणि तिथं असणाऱ्या सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या. बरं, त्यांचा उत्साह आणि अजित पवार यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठीची लगबग सुरु असल्याचंही या कॅमेरामध्ये कैद झालं. तिथं असणाऱ्यांकडे आपला मोबाईल देत थेट अजित पवारांनीच त्यांना फोटो काढायला सांगावं यासाठी त्यांनी विनंतीपर सूरही आळवला. या क्षणांचा व्हिडीओ समोर येताच या महिला कोण आहेत याचीचीही चर्चा झाली, पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 

दरम्यान, इथं गर्दीतून वाट काढत राज्याचे उपमुख्यमंत्री पुढे जात असतानाच महिलेनं पुन्हा एकदा ही आनंदाची बातमी सांगत 'प्रतिकला मुलगा झाल्याचा' निरोप त्यांना दिला आणि हा निरोप ऐकून अजित पवारांनीही शुभेच्छापर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेला हा संवाद पाहता, आपल्यासोबतचे कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत अजित पवार यांचं असणारं सहजतेचं आणि जिवाभावाचं नातं अधोरेखित झालं. एक मोठा नेता किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री याहीपलिकडे एक व्यक्ती म्हणून त्यांची इतकी लोकप्रियता नेमकी का आहे हेच इथं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?