World Smallest Village Video : जगाच्या पाठीवर कुठलंही शहर असो किंवा गाव असो तिथे तुम्हाला खूप सारे घरं आणि तिथे अनेक संसार नांदताना दिसतात. पण तुम्हाला माहितीय आहे की, याच जगाच्या पाठीवर असं देखील एक गाव आहे तिथे एकटी महिला राहिते. तिच तिथली रहिवाशी आहे आणि तिच तिथली मालकीण आहे. हे गाव आहे अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील मोनोवी नावाचं अनोखं गाव. इथे फक्त एकच महिला राहते जिचं नाव आहे एल्शी आयलर. अनेक वर्षांपासून ती या गावात एकटीच राहते. म्हातारी असूनही गावातील सर्व कामं ती स्वत: सांभाळतं, मग ते सरकारी काम असो किंवा दैनंदिन देखभाल असो, असे एकाकी जीवन इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं. (World small village where only one woman lives in monowi viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनोवी हे जगातील सर्वात लहान गाव असून 2010 च्या जनगणनेनुसार, इथे फक्त एक व्यक्ती राहते ती म्हणजे एल्सी आयलर. 2020 च्या जनगणनेच्या वेळी एल्सी 86 वर्षांची होत्या. आजही त्या मोनोवीमध्ये एकट्या राहत असून एल्सी गावातील सर्व कामं स्वत: हाताळतात. त्या गावच्या प्रमुख आहे आणि उदरनिर्वाहसाठी त्या बार चालवतात आणि ग्रंथपाल म्हणूनही काम करतात.


मोनोवी गाव सुमारे 54 हेक्टरमध्ये पसरलेलंय. तुम्हाला माहितीये का एकेकाळी या इवल्याशा गावात खूप वर्दळ होती. 1930 साली या गावात 123 लोक राहत होते. पण कालांतराने गावाची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली आणि 1980 पर्यंत येथे फक्त 18 लोक राहिलीत. नंतर 2000 मध्ये फक्त एल्सी आयलर आणि तिचा पती रुडी या गावात राहिलेत. 



2004 मध्ये रुडीच्या मृत्यूनंतर एल्सी या गावात एकटीच राहतेय. हे गाव अगदी निर्ज्जन असून इथे उन्हाळ्यात अनेक पर्यटक येत असतात. या पर्यटकांची एल्सी सर्व काळजी घेते. हे पर्यटक अनोखे गाव पाहायला येतात आणि एल्सीला मदतही करतात.