World's Fastest Shoes: तुम्हला जगातील सर्वात फास्ट किंवा सर्वात वेगवान शूजबाबत माहिती ( Worlds fastest shoes) आहे का? हे शूज बनवणारी कंपनी असा दावा करते आहे. त्यांचे शूज घालताच तुमचा चालण्याचा स्पीड 250% वाढतो असा हा दावा आहे. म्हणजेच तुम्ही चालता चालता पळू देखील शकतात. तुम्हीही हे शूज खरेदी करू शकतात. जाणून घेऊयात या स्मार्ट शूजची किंमत आणि त्यांना वापरण्याची पद्धत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणतात तुम्हाला फिट राहायचं असेल, दीर्घायुषी राहायचं असेल तर चालत राहा ( Walking is good for health) . तुम्ही जेवढं चालाल तेवढे तुम्ही फिट अँड फाईन राहाल. चालण्याचे अनेक फायदे आहेत.  मात्र अनेकजण कंटाळा येतो म्हणून चालत नाहीत. अशांसाठी बाजारात भन्नाट ( Smart Shoees) शूज आले आहेत. हे शूज घालून तुमच्या चालण्याचा स्पीड वाढतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. हे शूज घालून तुम्ही पाऊल उचललं की पाय आपोआप पुढे जातील अशी भन्नाट टेक्नॉलॉजि या शूजमध्ये असल्याचं कंपनी सांगते. अशा शूजच्या वापराने अनेकांची दुचाकीची गरजही संपू शकते?


आपण कार किंवा बाईक का वापरतो? अर्थात कुठेही लवकर पोहचण्यासाठी. पण हाच स्पीड तुम्हाला चालताना मिळाला तर? मग, तुम्ही चालणं पसंत कराल का? आम्ही हे तुम्हाला यासाठी विचारतोय कारण बाजारात स्मार्ट शूज आले आहेत. जे शूज घातल्याने तुमचा स्पीड 250 टक्के वाढतो, असं कंपनी म्हणते. म्हणजेच एकदा तुम्ही हे शूज घातले की तुम्ही रस्त्यावरून चालणार नाही, एखाद्या गाडीसारखे पळाल. या शूजला मूनवॉकर्स बोललं जातं. 


काय आहे Moonwalkers?


या बुटांचं नाव मूनवॉकर्स (Moonwalkers) आहे. या बुटांखाली लहान टायर्स लावलेले पाहायला मिळतात. हे बूट Shift Robotics या कंपनीने तयार केलेले आहेत. तुम्हाला हे स्केटिंग शूज वाटत असतील, मात्र तसं नाही. कंपनीच्या माहितीप्रमाणे हे अत्यंत नव्या पद्धतीचे शूज आहेत, ज्याला जगातील सर्वात फास्ट शूज म्हणून आपण संबोधू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे हे शूज तुम्ही तुमच्या शूजवर किंवा फ्लोटर्सवर देखील वापरू शकतात. यानंतर तुमच्या चालण्याचा स्पीड वाढेल.     


11 Kmph चा स्पीड


या स्मार्ट शूजमध्ये हिंज डिझाईन पाहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य स्पीडमध्ये चालणाऱ्या व्यक्तीला अधिक गती प्राप्त होते. या शूजला एकूण 8 चाकं लावण्यात आलेली आहेत. ज्यामुळे तुम्ही कैक अधिक पटीने वेगात चालू शकाल.  स्वतः कंपनीने याबाबतचा एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हा कोणत्या तरी साय फाय सिनेमाचा हिस्सा असल्याचा भास होईल. कंपनीच्या माहितीप्रमाणे तुम्हला चालताना तब्बल 11Kmph चा स्पीड मिळू शकतो.  


किंमत जाणून घ्या


मूनवॉकर्स या शूजसाठी तुम्हाला साधारण शूजपेक्षा बरेच जास्त पैसे मोजावे लागतील. या बुटांची सुरुवातीची किंमत 1099 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 91 हजार रुपयांपर्यंत आहे. सध्या कंपनी या शूजच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य गोळा करते आहे. या शूजची खासियत म्हणजे यामध्ये इलेक्ट्रिक ब्रेक्सही लावले आहेत. या ब्रेक्सना पायांच्या विशिष्ठ हालचालींनुनसार सेट करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला चार्जिंग पोर्ट आणि पावर बटन्स असे फीचर्स देखील मिळतात. 


Zee 24 Taas Live Tv पाहा : 



विश्वासार्ह मराठी बातम्या वाचण्यासाठी Zee24Taas चं मोबाईल ऍप डाउनलोड करा 


Android Link - https://bit.ly/3ECP5qG


Apple Link - https://apple.co/3E8MIKw


आमच्या सोशल मीडिया पेजेससोबतही जोडले जा : TwitterFacebookInstagramYoutube