डिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका!

पण हळूहळू तिला असं लक्षात आलं की, फक्त तिचं काम वाढत चाललं आहे, यासोबत तिच्या बॉससाठी ती अशी कर्मचारी झाली की, तिच्या बॉसला जेव्हा वाटलं तेव्हा तो तिच्यावर संताप काढत होता.

दयाशंकर मिश्र | Updated: Feb 14, 2019, 05:44 PM IST
डिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका! title=

दयाशंकर मिश्र : तुमच्यासमोर येणारी आजची ही कहाणी, आपल्यातील अनेक लोकांसाठी महत्वाचा खुराक असल्यासारखीच आहे. गुडगावची स्नेहा वर्मा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती. स्नेहाने काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आणि तिने एका छोट्या कंपनीत जाण्याचा निर्णय घेतला. स्नेहाचा हा निर्णय तिच्या जवळ मित्रांना, नातेवाईकांना योग्य वाटला नाही. पण ती आपल्या निर्णयावर कायम राहिली. या घटनेच्या सहा महिन्यानंतर ती 'डिअर जिंदगी'च्या एका 'जीवन संवाद' दरम्यान भेटली. या ठिकाणी तिने तिचे अनुभव शेअर केले.

स्नेहाने सांगितलं की, तिथे काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं. ती अतिशय जोमाने आणि उत्साहाने, सर्वोत्तम तिथे काम करत होती. सर्व काही नीट नेटकं सुरू होतं. यानंतर हळूहळू तिचं काम वाढत चाललं होतं. हे तिने सहज स्वीकार केलं. 

तिला असं वाटलं की, जबाबदारीचा अर्थ असा आहे की, तिच्यावर कंपनीचा विश्वास वाढत चालला आहे. पण हळूहळू तिला असं लक्षात आलं की, फक्त तिचं काम वाढत चाललं आहे, यासोबत तिच्या बॉससाठी ती अशी कर्मचारी झाली की, तिच्या बॉसला जेव्हा वाटलं तेव्हा तो तिच्यावर संताप काढत होता.

स्नेहा म्हणते की, यामुळे सर्व काही उलट होत गेलं. ती आपल्या ५ वर्षाच्या मुलासोबत देखील नीट राहू शकत नव्हती. तिच्या पतीला हे समजत नव्हतं की, आपल्या चांगल्या धडाकेबाज पत्नीचा असा आत्मविश्वास असा दबावाखाली का आला आहे. स्नेहा या आधी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत होती. अखेर त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी केवळ दोन गोष्टींसाठी सल्ला दिला.

तुम्हाला ज्या व्यक्तीकडून त्रास होतोय, असं वाटतंय, त्याच्याशी बोला. आपली गोष्ट योग्य पद्धतीने, पण शांत आणि सौम्यताने ठेवा. जीवन नोकरीपेक्षाही महत्वाचं आहे. कंपनी केवढी आहे ते महत्वाचं नाही. तिथे मिळणाऱ्या वातावरणाला महत्व द्या. आपल्याकडून योग्य त्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करा. पण यासोबत परिवर्तनाला देखील तयार राहा.

यानंतर असं झालं की, स्नेहाने याबाबतीत आपल्या बॉससोबत विस्ताराने चर्चा केली. मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की, बॉस काही वाईट माणूस नाहीय. पण त्याच्या कामाच्या गोष्टींमध्ये थोडी कमतरता येत आहे, हे खरं तणावाचं कारण आहे.

स्नेहा म्हणाली, बॉसच्या असफलतेची किंमत मी कुठपर्यंत चुकवायची, बॉसने हे देखील स्वीकारलं की, अनेक वेळा दुसऱ्यांचा संताप तिच्यावर निघतो. कारण दुसऱ्यांच्या तुलनेत स्नेहाचं व्यक्तिमत्व उदार, संवेदनशील आहे. पण स्नेहा यावर म्हणाली, हा तर माझ्यावर अन्याय आहे. यावर बॉसकडे कोणतंही उत्तर नव्हतं, यानंतर स्नेहाने परिवर्तनाच्या हिशेबाला अधिक महत्व दिलं नाही. तिने जीवनाला महत्व दिलं.

जीवनात सर्वात महत्वाचे तुम्ही आहात, सर्वात मौल्यवान तुमच्यापेक्षा कुणीही नाही. कोणताही वादा नाही, ध्येय नाही. म्हणून तुमची चिंता सर्वात आधी करा.

स्नेहाने जो निर्णय घेतला, त्यावर वेगवेगळे दृष्टीकोण असू शकतात. प्रत्येकाला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्याबद्दल विचारलं तर मी सांगेन, मी याबाबतीत स्नेहासोबत आहे. कारण जीवनाविषयी माझं प्राधान्य ठरलेलं आहे लहान लहान गोष्टीत आपल्याला अडकायचं नाही, कारण जीवनाला एका वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे.

जसं स्नेहाने केलं!

आशा, आपल्यापेक्षा दुप्पट वेगाने चालते, बस तिच्यासाठी एक पाऊल आधी चालणं गरजेचं आहे. जीवन कठीण नाही, जर काही कठीण असेल, तर आपली विचार करण्याची पद्धत. बस तिथेच बदलण्याची गरज आहे.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)