पाकिस्तानच्या वर्ल्ड कप प्रवेशाबाबत सरकार निर्णय घेईल- कपिल देव

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. हल्ल्यानंतर राजकीय, कलाक्षेत्र त्याचप्रमाणे क्रिडा क्षेत्रातही हल्ल्याचे पडसाड उमटताना दिसत आहेत

Updated: Feb 23, 2019, 12:39 PM IST
पाकिस्तानच्या वर्ल्ड कप प्रवेशाबाबत सरकार निर्णय घेईल- कपिल देव title=

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. हल्ल्यानंतर राजकीय, कलाक्षेत्र त्याचप्रमाणे क्रिडा क्षेत्रातही हल्ल्याचे पडसाड उमटताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते भारताने पाकिस्तान सोबत सामना खेळायचा की नाही हा निर्णय भारत सरकारचा आहे. आपल्या सारख्या लोकांनी स्वत:ची मते मांडू नये. सरकार जो काही निर्णय घेईल तो देशाच्या हितासाठी असल्याचे ते म्हणाले. शूक्रवारी पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी माजी कर्णधार कपिल देव उपस्थित होते. 

शूक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान विरूद्ध सामना खेळणार की नाही यावर कोणताही अंतीम निर्णय झालेला नाही. 30 मे पासून इंग्लंड मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी आयसीसीला पत्र लिहत खेळाडू, अधिकारी आणि क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षतेवरही विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. 

आयसीसीच्या बहुतेक सदस्यांनी पुलवामा हल्ल्याची निंदा करत भारताला सहकार्य केले आहे. बीसीसीआयने दहशतवादास संरक्षण देणार्या देशांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे  आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतीय खेळाडूंना उच्च स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी विनंती केली आहे