आयपीएलमधून CSK बाहेर, मुरली विजयवर निघाला राग

मुरली विजयवर चाहत्यांचा राग निघालेला दिसला

Updated: Nov 2, 2020, 11:49 AM IST
आयपीएलमधून CSK बाहेर, मुरली विजयवर निघाला राग title=

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल २०२० मधील आपल्या शेवटची मॅच जिंकली पण टीमचा परफॉर्मन्स खूप साधारण राहीला. १३ वर्षांच्या इतिहासात वर्षांच्या इतिहासात चेन्नई संघाने ११ वेळा आयपीएलमध्ये भाग घेतलाय. ज्यामध्ये या संघाने ८ वेळा अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला आणि १० वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. ही सिझनमध्ये पहील्यांदाच चेन्नई बाद फेरी गाठू शकली नाही. यानंतर मुरली विजयवर चाहत्यांचा राग निघालेला दिसला. 

सीएसकेच्या या कामगिरीवर टीका होत असताना क्रिकेट चाहत्यांनी युवा फलंदाज रुतुराज गायकवाड यांचे कौतुक केलंय. गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये लवकर समाविष्ट केले असते तर चेन्नईवरही वेळ आली नसती असे चाहते म्हणतायत. गायकवाडने आयपीएलमध्ये ६ सामने खेळले असून ५१ च्या सरासरीने २०४ रन्स बनवले आहेत. यामध्ये ३ अर्धशतक आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२०.७१ आहे.

माजी क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवागने देखील त्याचे कौतुक केलंय. ऋतुराज गायकवाडने आपली शैली दाखवलीय. शेवटपर्यंत टीकून मॅच फिनीशर कसं बनता येईल हे त्याने अनुभवी बॅट्समन्सना शिकवलंय. हे केवळ चेन्नईसाठी नव्हे तर आयपीएलसाठी चांगले संकेत आहेत असे विरुने म्हटले. 

गायकवाडच्या चांगल्या प्रदर्शनानंतर चेन्नईचे फॅन्स मुरली विजयला बाहेर करण्याची मागणी करतायत. मुरलीसाठी हा शेवटचा आयपीएल सीझन होता असे अनेकांना वटतंय. दरम्यान मुरलीने ३ मॅचमध्ये साधारण ३२ रन्स बनवले. यामुळे सोशल मीडियात हा बॅट्समन खूप ट्रोल होतोय.