पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे निधन, क्रिकेट जगतावर शोककळा

पाकिस्तानचे माजी स्पिनर अब्दुल कादिर यांचे लाहोरमध्ये निधन झाले आहे.

Updated: Sep 7, 2019, 11:14 AM IST
पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे निधन, क्रिकेट जगतावर शोककळा  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी स्पिनर अब्दुल कादिर यांचे लाहोरमध्ये निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. कार्डीएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला आहे. कादिर यांनी पाच वनडे मॅचमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली होती. ते डान्सिंग बॉलर नावाने प्रसिद्ध होते. भारताते व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंह, रविचंद्रन आश्विन, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली तर पाकिस्तानी वसीम अक्रम, शाहीद आफ्रीदी, शोएब अख्तर यांच्यासहीत जगभरातील अनेक क्रिकेटर्सनी यावर शोक व्यक्त केला आहे. 

उस्ताद अब्दुल कादीर यांच्या निधनामुळे शोकाकुल परिवार आणि मित्रांप्रती संवेदना असे ट्वीट पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केले आहे. मी दोन वर्षांपूर्वी त्यांना भेटलो होतो तेव्हा ते फिट आणि उर्जावान होते. एक चॅंपियन, महान माणूस म्हणून तुम्ही नेहमी आठवाल. तुमच्या परिवाराप्रति सहानभूती असे ट्विट हरभजन सिंह याने केले. 

त्यांच्या गोलंदाजीची स्टाईल वेगळी होती. त्यांना गोलंदाजी करताना पाहून नेहमी छान वाटायचं.  ते जगातील बेस्ट बॉलर्सपैकी एक होते, अशा भावना ऑफ स्पिनर रविचंदन आश्वनने व्यक्त केले. 

ब्रेटलीनेही त्यांना श्रद्धांजली देत त्यांनी पाकिस्तानचे नाव जगभरात पोहोचवले अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.