CBSE 12th Class Results : आज दुपारी 2 वाजता लागणार निकाल; जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

CBSE 12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी  2  वाजता 12 वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे.

Updated: Jul 30, 2021, 01:49 PM IST
CBSE 12th Class Results : आज दुपारी 2 वाजता लागणार निकाल; जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा title=

मुंबई : CBSE 12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी  2  वाजता 12 वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केलीय. निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती.  त्यानुसार आज निकाल जाहीर होणार आहे.

यावर्षी कोरोनाच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरली आहे. तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

12 वीचा निकाल जाहीर करताना त्यामध्ये दहावी वीच्या गुणांचाही विचार करण्यात येणार आहे. दहावीच्या गुणांना 30 टक्क्यांपर्यंत महत्व या निकाला दिलं जाणार आहे. तसेच 11 वीच्या निकालाचं महत्व 30टक्के आणि 12 वीमधील कमागिरीसाठी 40 टक्क्यांपैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये चाचणी परीक्षा, प्री बोर्ड  परीक्षा गुणांचा विचार केला जाणार आहे.

सीबीएसईने 10 वी आणि 12 वीला बाहेर बसलेल्यांची परीक्षा ऑगस्ट 16 ते सप्टेंबर 15 दरम्यान घेतली जाणार असल्याचं सांगितले आहे. नवीन मुल्यांकन पद्धतीने या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करता येणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. हे विद्यार्थी सीबीएईच्या शाळांमधीलच आहेत, असे नसून आधीच्या गुणांचा आधार यांचा निकाल लावताना घेता येणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे. 

विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. या संकेतस्थळावर cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in  निकाल पाहता येणार आहे.

असा पाहा निकाल

सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.
होमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा
 स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर पर्याय निवडा
त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल