CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप

 CBSE Board Exam Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा 2023 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील. 

Updated: May 12, 2023, 11:10 AM IST
CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप title=

CBSE Board Exam Results 2023 : इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा निकालाबाबत महत्त्वाची बातमी. CBSE इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील, तेही घरबसल्या. दरम्यान, CBSE 12th Result 2023 : 12वी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा मेरीट लिस्ट असणार नाही. सीबीएसईने शुक्रवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात. अस्वास्थव स्पर्धा टाळण्यासाठी यंदा मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय CBSEनं घेतलाय.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सीबीएसई cbseresults.nic.in,results.cbse.nic.in आणि cbse.gov.in परीक्षेचा निकाल पाहण्यास आणि डाऊनलोड करता येणार आहे. CBSE च्या अधिकृत वेबसाईट्स व्यतिरिक्त CBSE बोर्ड परीक्षा इयत्ता 10, 12 चे निकाल उमंग अ‍ॅप आणि डिजीलॉकरवर देखील उपलब्ध असतील.

बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाबाबत सीबीएसईने अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नसली तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकाल आठवडाभरात जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थी एकाच वेळी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट देतात. अशा परिस्थितीत काही काळ डोमेन क्रॅश होण्याची शक्यता असते. यानंतर सीबीएसईने उमंग अ‍ॅप आणि डिजीलॉकरवर निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी त्यांची डिजिटल मार्कशीट DigiLocker वरुन मिळवू शकतात, जिथे मार्कशीट कशी डाऊनलोड करावी याबद्दल माहिती जाणून घ्या आणि सूचना दिल्याप्रमाणे कृती करा.

प्रथम अधिकृत वेबसाइट निकाल तपासण्याचा हा सोपा मार्ग आहे.

  • cbseservices.digilocker.gov.in/activecbse ला भेट द्या. 
  • यानंतर अकाउंट बनवा लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती आणि शाळेने दिलेला 6 अंकी पिन एंटर करा.
  • तपशील सत्यापित करा आणि प्राप्त झालेल्या OTP सह सत्यापित करा.
  • आता तुमचे डिजिलॉकर खाते सक्रिय होईल.
  • निकाल घोषित झाल्यावर, अ‍ॅप उघडा आणि निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक तपशील भरा आणि आपल्या डिजिटल मार्कशीटमध्ये प्रवेश करा.