संध्याकाळी ५.३० वाजता महाविद्यालयीन प्रवेशाची कट ऑफ लिस्ट होणार जाहीर

....

Updated: Jun 19, 2018, 01:41 PM IST

मुंबई: बारावीच्या निकालानंतर आज (मंगळवार,१९ जून) मुंबईत प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे. यंदा प्रवेशाची यादी प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर झाल्यावर पुढच्या तीन दिवसात प्रवेश घेणं गरजेचं आहे. दुसरी याची २२ तारखेला तर तिसरी यादी २७ तारखेला तिसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. ३० जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

बारावी नंतरच्या महाविद्यालयीन प्रवेशाची पहीली यादी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालये प्रकाशीत करतील पहीली प्रवेश यादी. यंदा प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश यादी जाहीर झाल्या नंतर मुलांना कटऑफ पाहायला मिळु शकेल. त्या नंतर पुढील तीन दिवस अर्थात २०,२१,२२ या तीन दिवसांत एफवायला प्रवेश घेता येईल . त्यानंतर २२तारखेला दुसरी  आणि २७ तारखेला तिसरी यादी जाहीर होईल . साधारणपणे ३०जुन पर्यंत प्रवेश प्रकिया पुर्ण होण्याची शक्यता.