बॅंक किंवा पोस्ट ऑफिसपेक्षा 'इथे' पैसे गुंतवल्यास मिळेल अधिक फायदा...

 पैसे सर्वांनाच प्रिय असतात आणि आपल्याला अधिकाधिक पैसे मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 04:22 PM IST
बॅंक किंवा पोस्ट ऑफिसपेक्षा 'इथे' पैसे गुंतवल्यास मिळेल अधिक फायदा... title=

नवी दिल्ली : पैसे सर्वांनाच प्रिय असतात आणि आपल्याला अधिकाधिक पैसे मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

गुंतवणूकीचे मार्ग

त्यासाठी आपण गुंतवणूकीचा मार्ग स्विकारतो. मात्र अनेकदा घाईत किंवा अधिक चौकशी न करता आपण चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतो. त्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येते. म्हणूनच गुंतवणूक करताना नीट चौकशी करा. 

बॅंकेत गुंतवणूक

म्युचुअल फंडात जलद गतीने पैसे डबल होतात. मात्र त्यावर अधिक लोकांचा विश्वास नाही. तसंच अनेक लोक शेअर मार्केटपासून दूर राहणेच पसंत करतात. अशावेळी त्यांच्याकडे बॅंक किंवा पोस्ट ऑफीसचाच पर्याय उरतो. त्यात परत बॅंकेत पैसे लवकर डबल होतील की शेअर मार्केटमध्ये, याची माहिती लोकांना नसते. तर बॅंकेपेक्षा पोस्ट ऑफीसमध्ये पैसे लवकर डबल होतात. बॅंकेपेक्षा २ वर्ष कमी लागतात.

सरकारी बॅंकेत FD केल्याने पैसे १२ वर्षात डबल होतात. सध्या SBI ५-१० वर्षांच्या FD वर ६% व्याज देते. या व्याजदराने १ लाख रूपये १२ वर्षात २ लाखांपेक्षा अधिक होतील.

SBI मध्ये FD केल्यावर

६% व्याजदर (५-१० वर्षांच्या FD वर) 
१ लाखाची गुंतवणूक
१२ वर्ष
२ लाखांपेक्षा अधिक रक्कम परत

 पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक

बॅंकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे २ वर्षापेक्षा कमी वेळात डबल होतील. पोस्‍ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या डिपॉझिटमध्ये सध्या ७.६% व्याजदर आहे. टाईम डिपॉझिट एका वेळेस अधिकाधिक ५ वर्षांसाठी करता येईल. यामध्ये जर व्याजासह मिळालेले पैसे पुन्हा गुंतवले तर १० वर्षात रक्कम डबल होईल.

पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट केल्यास

७.६% व्याजदर (५ वर्षांसाठी)
१ लाखाची गुंतवणूक
१० वर्षात २ लाखाहून अधिक रक्कम परत

बॅंक किंवा पोस्ट ऑफिसपेक्षा इथे अधिक फायदा

पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकासपत्रात पैसे ११५ महिन्यात (९ वर्ष ७ महिन्यात डबल) डबल होतील. १०,००० आणि ५०,००० रूपयांचे KVP असतात. यात वर्षांची काही मर्यादा नाही. गरज पडल्यास अडीच वर्षात रक्कम काढता येईल.