'इतकी' आहे इत्तेफाक ची पहिल्या दिवसाची कमाई!

सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'इत्तेफाक' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 4, 2017, 01:27 PM IST
'इतकी' आहे इत्तेफाक ची पहिल्या दिवसाची कमाई! title=

नवी दिल्ली : सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'इत्तेफाक' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. थ्रिलर मर्डर मिस्ट्री असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असला तरी चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही खास नव्हते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा याने ब्रिटनमधील सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठी याची भूमिका केली आहे. तर सोनाक्षी सिन्हाने माया सिन्हा आणि अक्षय खन्ना याने पोलीस अधिकारी देव वर्माची भूमिका केली आहे. 

यात विक्रम आणि माया दोघांवर देखील खुनाचा संशय असतो. यातील खरा गुन्हेगाराच्या शोधात देव म्हणजे अक्षय खन्ना आहे. अखेरीस गुन्ह्याचा छडा लागतो आणि गुन्हेगार पकडला जातो. 

चित्रपटाचे दोन दिवसाचे कलेक्शन ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श ट्विटरवर शेअर केले आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी चित्रपटाने ४.०५ कोटींचा गल्ला केला. त्याचबरोबर तरण म्हणाले की, "शनिवार रविवारी हा चित्रपट अधिक चांगले प्रदर्शन करू शकतो."

या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट, धर्मा प्रॉडक्शन आणि  बीआर स्टूडियो यांनी एकत्रितपणे केली आहे. चित्रपटाची गंमत, मज्जा टिकून राहण्यासाठी यातील गूढ न उकलण्याचा संदेश निर्मात्यांकडून करण्यात आले होते.