रणवीरचा '८३' मधील फर्स्ट लूक पाहिलात?

कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीरचा हुबेहुब लूक 

Updated: Jul 6, 2019, 12:28 PM IST
रणवीरचा '८३' मधील फर्स्ट लूक पाहिलात? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी रणवीरने सोशल मीडियावर '८३' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. रणवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा लूक कपिल देव यांच्याशी अगदी मिळता-जुळता दिसत आहे. फोटोमध्ये रणवीर कपिल देव यांच्या गेटअप असून त्याच्या डोळ्यांतूनही कपिल देव यांची झलक दिसून येतेय.

'८३' चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. रणवीर या भूमिकेसाठी अतिशय मेहनत करत असून त्यांचं कौशल्य, त्यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणवीरने क्रिकेट प्रॅक्टिसचा व्हिडिओही शेअर केला होता. चित्रपटात कपिल देव यांची भूमिका चोखपणे साकारण्यासाठी रणवीर आणि संपूर्ण टीमने माजी क्रिकेटर बलविंदर सिंह संधू यांच्याकडून प्रशिक्षणही घेतलं आहे.  

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

या चित्रपटात रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटातून झळकणार आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे. रणवीर-दीपिकासह चित्रपटात पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटिल, ताहिर भासिन, साहिल खट्टर, आर बद्री, हार्डी संधु, एमी विर्क हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

कबीर खान दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटातून १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या यशोगाथेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२० रोजी क्रिकेटमधील सुवर्ण अध्यायाला झळाळी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.