Oscars2020 : ऑस्करसाठी अंथरलेल्या रेड कार्पेटची किंमत ऐकून धक्काच बसेल

तब्बल ९०० तास हे रेड कार्पेट अंथरण्याचं काम सुरु होतं 

Updated: Feb 9, 2020, 05:20 PM IST
Oscars2020 : ऑस्करसाठी अंथरलेल्या रेड कार्पेटची किंमत ऐकून धक्काच बसेल  title=
छाया सौजन्य- Vox

मुंबई : अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे अवघ्या काही तासांनीच यंदाचा The Academy Awards म्हणजेच ऑस्कर Oscars2020 पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी तयार होत असतानाच ज्या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे, तेथेसुद्धा एक न्यारा थाट पाहायला मिळत आहे. 

साऱ्या मनोरंजन विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट शो विषयीसुद्धा कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ऑस्करचं व्यासपीठच नव्हे, तर यंदाच्या वर्षी या सोहळ्यासाठी अंथरण्यात आलेल्या रेड कार्पेट अर्थात लाल रंगाच्या मखमली सतरंजीवजा कापडाच्याही चर्चा रंगल्या आहेत. 

वाचा : Oscars2020 : ऑस्करच्या गुडी बॅगमधील वस्तूंची किंमत ऐकून धक्काच बसेल

यंदाच्या वर्षी ऑस्कर सोहळ्याच्या निमित्ताने Red Carpet रेड कार्पेटसाठी तब्बल १८ कामगारांनी मेहनत घेतली असून, ९०० तासांच्या मेहनतीनंतर ऑस्कर सोहला होत असणाऱ्या ठिकाणावर अक्षरश: ही लाल रंगाची चादर चढवली. अतिभव्य अशा या रेड कार्पेटसाठी तब्बल २० लाख रुपयांचा खर्च केला गेला आहे. ज्यावरुनच जगभरात गाजलेले सेलिब्रिटी आणि अफलातून कलाविष्कार साजरा करणारी मंडळी मुख्य सभागृहात जातील. मुख्य म्हणजे रेड कार्पेटवरच त्यांचं अनोखं असं फोटोशूटही होणार आहे. शिवाय या रेड कार्पेटच्या संरक्षणासाठीही ठराविक व्यवस्था करण्यात आली आहे. 

ऑस्करसाठी करण्यात आलेली ही सर्व व्यवस्था पाहता, आता यंदाच्या वर्षी रेड कार्पेटवर कोणाच्या अदा आणि कोणाचा रुबाब अधिक उठावदार दिसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.