आपल्या भावासोबत उभी असलेली गोंडस मुलगी करतेय इंडस्ट्रीवर राज्य, ओळखा पाहू

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहून भल्याभल्यांनाही घाम फुटतोय.

Updated: Apr 19, 2022, 11:16 PM IST
आपल्या भावासोबत उभी असलेली गोंडस मुलगी करतेय इंडस्ट्रीवर राज्य, ओळखा पाहू title=

मुंबई : येत्या काही दिवसांत बॉलीवूड सेलिब्रिटींचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे हे सेलिब्रिटी कोण आहेत हे ओळखणंही कठीण झालं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहून भल्याभल्यांनाही घाम फुटतोय.

पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जिला ओळखण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करत आहेत. फोटोत दिसणारी मुलगी इतकी गोंडस आहे की तिला पाहून तुम्हालाही प्रसन्न वाटेल. याचबरोबर या चिमुकलीचा फोटो पाहून तुम्हालाही विचार करायला भाग पडेल की, ही मुलगी आहे तरी कोण?

जर तुम्ही अजूनही या गोंडस मुलीला ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आहे. तसंच, फोटोमध्ये तिच्यासोबत दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून तिचा भाऊ राज मुखर्जी आहे. एक काळ असा होता की राणी मुखर्जीची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. राणीच्या अभिनयासोबतच तिच्या क्यूटनेसचीही बरीच चर्चा झाली. एवढंच नाही तर राणी मुखर्जीला इंडस्ट्रीची राणी म्हटलं जातं.