म्हणून… बांद्राच्या बंगल्यात ‘ही’ फॅशन डिझायनर मैत्रीण सोनम कपुरचं करणार डोहाळे जेवण! जाणून घ्या कारण..

हे डोहाळे जेवण परदेशात होणार नसून ते चक्क मुंबईतील बांद्राच्या बंगल्यात होणार आहे.

Updated: Jul 12, 2022, 09:21 PM IST
म्हणून… बांद्राच्या बंगल्यात ‘ही’ फॅशन डिझायनर मैत्रीण सोनम कपुरचं करणार डोहाळे जेवण! जाणून घ्या कारण.. title=

मुंबईः अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सध्या त्यामुळेच तिचे तिच्या परिवाराकडून तसेच मित्रपरिवाराकडून लाड होतायत. नुकतेच सोनमने लंडनमध्ये आपले डोहाळे जेवण केलं. लवकरच तिची जवळची आणि जिवलग मैत्रीणही तिच्यासाठी डोहाळे जेवणाचे प्लॅनिंग करत आहे. हे डोहाळे जेवण परदेशात होणार नसून ते चक्क मुंबईतील बांद्राच्या बंगल्यात होणार आहे.

सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा त्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक अध्याय सुरू करणार आहेत. ते सध्या आई-बाबा होण्याची जोरदार तयारी करत आहेत. या वर्षाच्या मार्चमध्येच त्यांनी ते दोघं आई-बाबा होण्याची गुड न्यूज अनपेक्षितपणे सोशल मीडियावर शेअर केली होती त्यात सोनमही आपले बेबी बंप फ्लाँन्ट करत सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर केले होते. अनेकांनी तिच्या या बेबी बंप फ्लोंन्टिंगचे कौतुकही केले तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केली.  

लंडनमध्ये सर्वात महागडं डोहाळे जेवण केल्यानंतर आता सोनमचं मुंबईत लवकरच डोहाळे जेवण पार पडणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोनमचे तिच्या मावशीच्या म्हणजेच कविता सिंगच्या मुंबईतील बांद्रा येथील रॉकडेल या बंगल्यावर दिमाखदार डोहाळे जेवण होणार आहे. २०१८ मध्ये सोनम आणि आनंदचेही त्याच बंगल्यात लग्न झाले होते त्यामुळे फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आपल्या लाडक्या मैत्रीणीचे म्हणजेच सोनम कपूरचे डोहाळे जेवण त्याच बंगल्यात करणार असल्याचे बोललं जात आहे.

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता सोनमच्या डोहाळे जेवणाच्या इव्हेंटची संपूर्ण तयारी स्वतः करणार आहे आणि बेबी शॉवरसाठी बोहो-थीमची सजावट यावेळी मसाबा करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या या डोहाळे जेवणाला अख्खं बॉलीवूड हजर राहणार आहे.

स्वरा भास्कर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलीन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, मसाबा आणि राणी मुखर्जी हे सर्व जण सोनमच्या बेबी शॉवरला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. खुशी, शनाया, अंशुला, अर्जुन आणि मोहित, जान्हवी कपूरही यावेळी सोनमच्या डोहाळे जेवणाला उपस्थित राहणार आहेत. मसाबा गुप्ता आणि सोनम कपूर या दोघी बी-टाऊन बीएफएफ असून त्या दोघी एकमेकींना लहानपणापासून ओळखतात.