'आई कुठे काय करते', मालिकेतून ईशा घेणार एक्झिट?

मालिकेतून ईशा हे पात्र घराघरात पोहोचवलं

Updated: May 4, 2021, 09:19 AM IST
'आई कुठे काय करते', मालिकेतून ईशा घेणार एक्झिट? title=

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते?' ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटतं. मालिकेतील लोकप्रियता ही कथा आणि त्याचबरोबर पात्र यांच्यामुळे वाटत चालली आहे. अरूंधतीची तिन्ही मुलं म्हणजे अभिषेक, यश आणि ईशा यांनी देखील चांगलीच पसंती मिळवली आहे. असं असताना ईशाने हिंदीत पदार्पण केलं आहे. त्यामुळे आता ईशा मालिका सोडणार का? अशी चर्चा रंगली आहे. 

ईशा म्हणजे अपूर्वा गोरे हिने 'वागळे की दुनिया' या मालिकेत एक पात्र साकारलं आहे. त्यामुळे आता ईशा 'आई कुठे काय करते?' या मालिकेतून एक्झिट घेणार की काय अशी चर्चा रंगली आहे. पण तसं होईल असं वाटतं नाही. कारण ईशाने आपल्या मालिकांचं शेड्युल खूप उत्तम प्रकारे मॅनेज केल्यामुळे ती दोन्ही मालिकांमध्ये दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva (@apurvagore)

तुम्हाला माहितच आहे, ईशा हे पात्र आई कुठे काय करते? या मालिकेत आता अत्यंत महत्वाचं आहे. अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट होत असताना ईशा त्यांना पुन्हा एकत्र आणण्यास मदत करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva (@apurvagore)

ईशा म्हणजे अपूर्वा गोरे सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव आहे. आपल्या सहकलाकारांसोबत नृत्याचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva (@apurvagore)

अपूर्वाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर 'वागळेची दुनिया' या मालिकेच्या सहकलाकारांसोबत फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva (@apurvagore)

तसेच सोनीने देखील ईशाचा एपिसोड शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony SAB (@sonysab)

यामध्ये ईशा एका नववधुच्या रुपात दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबियांना मिस करत असते. पण तेव्हाच वागळेची दुनियामध्ये कशा पद्धतीेने तिचं लग्न करतात हे पाहण्यासारखं असणार आहे.