'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाकाळात अश्विनीकडून गरजूंना खूप मदत 

Updated: May 19, 2021, 12:52 PM IST
'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन  title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघा हे पात्र अश्विनी साकारत आहे. तसेच 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना या महामारीत तिने आपल्या वडिलांना गमावलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या वडिलांना करोना झाला होता. त्यानंतर त्यांना भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतो. पण १८ मे रोजी त्यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीच्या वडिलांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अश्विनीने दोन वर्षांपूर्वी 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान' या संस्थेची निर्मिती केली. या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली. कोरोनाच्या संकटातही तिने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अश्विनीने संस्थेमार्फत कोरोनाकाळात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय केली होती. महत्वाची बाब म्हणजे ही सोय फक्त एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबवला. 

प्रदीप कुमार महांगडे यांचा नेहमीच राजकारण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांना भोर, पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आज अखेर सर्वांचे लाडके प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्यावर भोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.