'माणूस निघून गेला की .....' खास व्यक्तीच्या निधनानंतर मराठमोळी अभिनेत्री कोलमडली

'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीवर दुखाःचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने ती खचली   

Updated: Oct 31, 2022, 12:39 PM IST
'माणूस निघून गेला की .....' खास व्यक्तीच्या निधनानंतर मराठमोळी अभिनेत्री कोलमडली title=

मुंबई : 'आई कुठे काय करते’ (aai  kuthe kay karte) फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेवर (ashvini mahangade) दुखाःचा डोंगर कोसळला आहे. अश्विनीचा मानलेला भाऊ मंगेश यांचं निधन झालं आहे. भावाच्या निधनानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यामाधून भावना व्यक्त केल्या आहेत. एवढंच नाही तर अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक फोटो देखील पोस्ट केला. (ashvini mahangade serial)

काय म्हणाली अश्विनी महांगडे?
'एखादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय? त्याच्या चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला माणूस? प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते.'

अभिनेत्री पुढे म्हणते, ' मंगेशची "दिदू" झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसहित स्विकारता आलेच नाही कदाचित' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून...पण वेळ पुढे सरकलेला असतो.' 

'मंगेश.. आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला.. भावपूर्ण श्रद्धांजली...' असं म्हणत अभिनेत्री भावना व्यक्त केल्या आहेत. (ashvini mahangade social media )