आमिरच्या 'दंगल'नं तोडले भारतीय सिनेमांचे सगळे रेकॉर्ड

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल दोन हजार कोटींची कमाई केली आहे.

Updated: Jun 26, 2017, 08:29 PM IST
आमिरच्या 'दंगल'नं तोडले भारतीय सिनेमांचे सगळे रेकॉर्ड  title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल दोन हजार कोटींची कमाई केली आहे. दोन हजार कोटींची कमाई करणारा दंगल भारतातला पहिला सिनेमा ठरला असून राजामौलींच्या बाहुबली 2 या सिनेमाला कमाईच्या बाबतीत दंगलने मागे टाकलयं.

एकट्या चीनमध्ये या सिनेमाने तब्बल चौदाशे कोटींची कमाई केली आहे. चीनमधील कमाईमुळेचं दंगलला एवढी मोठी गरुड झेप घेता आल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगते आहे. त्यामुळे चीनमध्ये बॉलिवूडचं मार्केट वाढत असल्याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे.