अन् बर्‍याच प्रयत्नानंतर आमिर खानच्या हातात आले आईस्क्रिम

सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार आमीर खानचा एक व्हिडिओ फारच व्हायरल होतोय.

Updated: Oct 8, 2017, 03:21 PM IST
अन् बर्‍याच प्रयत्नानंतर आमिर खानच्या हातात आले आईस्क्रिम  title=

तुर्की : सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार आमीर खानचा एक व्हिडिओ फारच व्हायरल होतोय.

 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तुर्कीमध्ये सध्या आमीर खान आहे. तेथेच तो आईस्क्रिम खाताना हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. आमिर खानने आईस्क्रिमची ऑर्डर दिली परंतू ते हातामध्ये येईपर्यंत बरीच तारांबळ उडाली. 

आमिर खानने फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ खाली खास संदेश लिहला आहे. तुर्कीमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये ते देण्याची स्टाईल हटके आहे. दुकानदार  नेमक्या कोणत्या स्टाईलमध्ये आईस्क्रीम देतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 

 

'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटामध्ये आमिर खान एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. अद्वैत चौहान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये गायिका होऊ पाहणार्‍या एका मुलीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मुलीला गायिका होण्याची इच्छा आहे परंतू तिच्या वडिलांची या गोष्टीला संमती नसते. मग स्वतःची ओळख लपवून ती यूट्युबवर कशाप्रकारे प्रकाश झोकात येते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या दिवाळीमध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.