तुर्कीच्या फस्ट लेडीची भेटीनंतर ट्रोल झाला आमिर खान

आमिर खानने का घेतली भेट? 

Updated: Aug 17, 2020, 09:48 PM IST
तुर्कीच्या फस्ट लेडीची भेटीनंतर ट्रोल झाला आमिर खान  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या शुटिंगकरता तुर्की येथे गेला आहे. या दरम्यान रविवारी आमिर खानने तुर्कीच्या राष्ट्रपतींची पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतली. 

इस्तांबुलमधील राष्ट्रपती भवन हुबेर मॅशनमध्ये झालेल्या या भेटीचा फोटो तुर्कीच्या फस्ट लेडी एमीन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीनंतर अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर ट्रोल झाला. 

तुर्कीचे राष्ट्रपती, जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल ३७० काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात बोलले होते. आमिर खान आणि तुर्कीच्या फस्ट लेडीची भेट यामुळे भारतीय सोशल मीडिया युझर्स अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर ट्रोल करू करण्यात आलं. 

तिन्ही खान यांनी इजरायलच्या पंतप्रधानांशी भेट घेण्यास नकार दिला. मात्र तुर्कीच्या फस्ट लेडीशी भेटून आमिर खान खूष असल्याचं दिसतंय.