28 वर्षानंतर ही अभिनेत्री दिसणार आमिर खानसोबत

हे स्टार कलाकार या सिनेमात 

Updated: Aug 1, 2018, 07:56 PM IST
28 वर्षानंतर ही अभिनेत्री दिसणार आमिर खानसोबत title=

मुंबई : आमीर खानच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जे फॅन्स आमीर खानला धकधक गर्ल सोबत बघू इच्छितात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बॉलिवूडच्या कोपऱ्यातून अशी बातमी आली आहे की? दिग्दर्शक इंद्र कुमारच्या येणाऱ्या आगामी सिनेमा 'टोटल धमाल'मध्ये आमीर खान स्पेशल कॅमिओ करताना दिसणार आहे. आणि असं झालं तर तब्बल 28 वर्षांनंतर आमीर खान माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी इंद्र कुमार यांच्या 1991 मधील 'दिल' या सिनेमात दिसली होती. 

डीएनएने घेतलेल्या मुलाखतीत इंद्र कुमार आणि आमिर खान यांनी दिलेली माहिती. या मुलाखतीत त्यांनी 'टोटल धमाल' या सिनेमात आमिर खान कॅमिओ रोल करणार आहे. सिनेमात अनिल कपूर आणि आमिर खान एका सीनमध्ये दिसणार आहे. गेल्या आठवड्यात इंद्र कुमार यांनी दिलेल्या माहिती असे समोर आले की, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित तब्बल 26 वर्षांनी एकत्र काम करत आहे. 

 

Ek dum jhakass  #Anilkapoor#madhuriDixit #totaldhamaal @anilskapoor @madhuridixitnene

A post shared by Anil kapoor Forever (@anilkapoorforever) on

टोटल धमाल च्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर माधुरी दीक्षित, अनिल कपूरसोबतच अजय देवगन, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि रितेश देशमुख असणार आहे. अजय देवगन हा सिनेमा प्रोड्यूस करत आहे. हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.