पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आमिर

आमिर खानच्या नव्या सिनेमांची त्याच्या चाहत्यांनाच नेहमीच प्रतीक्षा असते. सध्या आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाची चाहते वाट पाहतायत.

Updated: Jun 11, 2017, 03:56 PM IST
पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आमिर title=

मुंबई : आमिर खानच्या नव्या सिनेमांची त्याच्या चाहत्यांनाच नेहमीच प्रतीक्षा असते. सध्या आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाची चाहते वाट पाहतायत.

या दरम्यान, आमिरच्या आणखी एका आगामी सिनेमाची घोषणा झालीये. दंगलच्या दमदार यशानंतर आमिर आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. 

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित सिनेमात आमिर दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सॅल्यूट आहे.