आजोबांच्याच पावलावर पाऊल ठेवतेय आराध्या बच्चन, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

आराध्याची ही कृती पाहता... 

Updated: Jan 10, 2022, 02:18 PM IST
आजोबांच्याच पावलावर पाऊल ठेवतेय आराध्या बच्चन, व्हिडीओ पाहून कराल कौतुक  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, आराध्या बच्चन ही हल्ली बरीच चर्चेत असते. मुळात बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सातत्यानं प्रकाशझोतात असल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. त्यातच आता आराध्याचीही भर. 

अवघ्या 10 वर्षांच्या वयात आराध्यानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत. तिनं स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. 

एक मोठा संदेश देतेय आराध्या... 

सध्या आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओधमध्ये ती लाल रंगाचा फ्रॉक घालून दिसत आहे. 

आराध्या इथं एका व्हिडीओमध्ये इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती महत्त्वाचा संदेश देताना दिसत आहे. 

'ही वेळ कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांची मदत करण्याची आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय इतरांचा विचार करण्याची ही वेळ आहे. आपण पूर्ण वर्षभरासाठीच सांताक्लॉज होण्याचा विचार करु शकोत का? करा याचा विचार...'

अवघ्या 10 वर्षांच्या वयात आराध्याला असणारी समज पाहता तिचं कौतुक करावं तितकं कमीच. 

बच्चन कुटुंबानं, खुद्द अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत कायमच इतरांच्या अडीनडीला मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच पावलावर आता आराध्याही पाऊल ठेवत असल्याचं पाहून, खाण तशी माती... असं म्हणणं वावगं ठरणार नाही.