ड्रग्सप्रकरणात आणखी एका अभिनेत्याला अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन 

Updated: Sep 19, 2020, 04:24 PM IST
ड्रग्सप्रकरणात आणखी एका अभिनेत्याला अटक  title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा ड्रग्स कनेक्शनशी संबंध आल्यामुळे एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) चा तपास सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे सिटी क्राइम ब्रांच पोलिसांनी (CCB) ने शनिवारी या ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टी अटक केली आहे. त्याच्या जवळ ड्रग्स ठेवण्याचा आरोप असून या प्रकरणाचा आता तपास केला जात आहे. 

किशोर शेट्टी एक लोकप्रिय डान्सर आहे. रेमो डिसोझा यांच्या ABCD सिनेमात काम केलं आहे. किशोर शेट्टी रिऍलिटी शो 'डान्स इंडिया डान्स'मधील स्पर्धक आहे. यामुळे तो कायमच चर्चेत राहिलेला आहे. 

सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आणखी एका कलाकाराला अटक केली आहे. एनसीबी मुंबईने ड्रग्स पेडलर राहिल विश्राम नावाच्या व्यक्तीला एक किलो चरससोबत अटक केली. याबाबतची माहिती एनसीबीचे जोनल डायरेक्टर यांनी दिली आहे. 

नाररोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे जोनल डायरेक्टर यांच्या म्हणण्यानुसार,'एनसीबी मुंबईने हिमाचल प्रदेश १ किलो चरससोबत ड्रग्स पेडलर राहिल विश्रामला अटक केली आहे. एनसीबीने त्याच्यासोबत ४.५ लाख रुपये नगद रुपयांसोबत अटक केलं आहे.'