अभिषेक बच्चनच्या 'या' प्रकारामुळे करण जोहर खेळत नाही होळी

सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींमध्येही होळी आणि रंगपंचमी या सणाचे स्पेशल प्लॅन असतात.

Updated: Mar 1, 2018, 06:08 PM IST
अभिषेक बच्चनच्या 'या' प्रकारामुळे करण जोहर खेळत नाही होळी  title=

मुंबई : सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींमध्येही होळी आणि रंगपंचमी या सणाचे स्पेशल प्लॅन असतात.

दिवाळी, होळी, न्यू इयर, ख्रिस्मस यासारखी अनेक मोठी सेलिब्रिशन्स बॉलिवूड एकत्र येऊन करतात. यामध्ये अग्रगण्य असणारे एक नाव म्हणजे करण जोहर. परंतू करण जोहर हा होळीच्या सणापासून मात्र थोडा दूर असतो.  

करण जोहर का नाही खेळत होळी ?  

'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' या रिएलिटी शोमध्ये करण जोहरने होळी न खेळण्याचा खास किस्सा सांगितला आहे. करण जोहरने सांगितल्यानुसार, लहानपणी करण बच्चन कुटुंबीयांकडे होळी खेळायला जात असे. 

अभिषेक  बच्चन आहे कारण ...   

अभिषेक बच्चन हा करण जोहर कधीच होळी न खेळण्याचं कारण आहे. ' मी रंगांची होळी खेळत नाही' असे करण जोहर म्हणणार इतक्यात अभिषेकने त्याला मागून धक्का  देऊन पूलमध्ये पाडले. या प्रसंगानंतर करण जोहर होळी खेळण्याची हिंमत करत नाही. 

सेलिब्रिटींची होळी 

बच्चन कुटुंबीयांप्रमाणेच जावेद अख्तर- शबाना आझमी, कपूर कुटुंबीयांची, होळी प्रसिद्ध आहे. 

यंदा होळी, रंगपंचमी नाही 

यंदा श्रीदेवीचे अकाली निधन झाल्याने बॉलिवूडसह श्रीदेवीच्या सोसायटीने होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.