ऐश्वर्या रॉय Miss World झाली तेव्हा असा दिसायचा अभिषेक बच्चन, फोटो होतोय व्हायरल

अभिषेक बच्चनचा 'तो' फोटो होतोय व्हायरल, फोटोवर कमेंटचा पाऊस

Updated: Sep 5, 2022, 11:33 PM IST
ऐश्वर्या रॉय Miss World झाली तेव्हा असा दिसायचा अभिषेक बच्चन, फोटो होतोय व्हायरल title=

Entertainment News : हिंदी सिनेमासृष्टीतली (Bollywood) एक यशस्वी जोडी म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai). अभिषेक आणि ऐश्वर्या, दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. चित्रीकरण सुरु असताना दोघांचे सूर जुळले. 2007 च्या जानेवारी महिन्यात या जोडीने गुपचूप साखरपुडा केला आणि 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह सोहळा 'प्रतिक्षा' बंगल्यात संपन्न झाला.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. यानंतर 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' या गाण्याचे शूटींग सुरु असताना दोघांचं सूत जुळलं. आणि 'गुरु' चित्रपटाच्या सेटवर दोघांचं प्रेम चांगलंच बहरलं. 

ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड
या दोघांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे अभिषेक बच्चन याचा एक जुना फोटो व्हायरल होतोय. हा फोटो 1994 मधला असल्याचं सांगितलं जात आहे. याच वर्षात ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड (Miss World) बनली होती. त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या फोटोत अभिषेक आपले वडिल आणि बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन अगदी साध्या पेहरावात दिसत आहे.

त्याचवेळी ऐश्वर्या रॉयचा मिस वर्ल्ड दरम्याचा फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत ऐश्वर्या रॉयच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज आहे. आणि मिस वर्ल्डच्या कपड्यांमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यानंतर ऐश्वर्या रॉयने हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण केलं आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून काम कमावलं.