राजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते.... 

Updated: Jan 14, 2020, 06:27 PM IST
राजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून. आता ‘चंद्रमुखी’ हे नाव पाहताही येणार आहे. तेसुद्धा मोठ्या पडद्याच्या माध्यमातून.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्या चित्रपटाचं नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतील एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतच सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशाची कला यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

प्रसिध्द लेखकाच्या प्रसिध्द लेखणीवर जेव्हा एखादा चित्रपट तयार केला जातो तेव्हा त्याच्या दिग्दर्शनाकडे अनेकांच्या नजरा असतात. अर्थात दिग्दर्शनासोबतच पटकथेकडूनही बऱ्याच अपेक्षा असतात.  

कारण, कादंबरीत जे मांडलंण्यात आलं आहे, ते पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. हीच अपेक्षा पाहता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याच्यावर सोपवण्यात आली आहे. .

लेखकाच्या लेखणीचंही अस्तित्वं चित्रपटातून मांडण्याचं प्रसाद ओकचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटातून अनुभवलं आहे. एकिकडे प्रसादचं दिग्दर्शन असतानाच चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून साकारणार आहेत. त्यामुळे  यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.