मुंबई : अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी त्याला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. अशा आशयाचे एक ट्विट केले आहे. त्यानंतर चाहत्यांना, मित्रांना त्यांच्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा पाठवण्यासाठी आवाहन केले होते.
— Irrfan (@irrfank) March 5, 2018
विशाल भारद्वाजच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विशाल भारद्वाजला प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले होते. सुरूवातीला हा आजार कावीळ असेल असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र हा गंभीर आजार 'ब्रेन कॅन्सर' असल्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. याबाबत कोणाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इरफान खानला ग्लायोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) हा ब्रेन कॅन्सर असल्याची माहिती काही रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. ग्लायोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) हा आक्रमक स्वरूपाचा ब्रेन कॅन्सर आहे.
जीबीएमला ' डेथ ऑफ डायग्नोसिस' असेही म्हटले जाते. सुरूवातीच्या टप्प्यावर या आजाराची कोणतीही लक्षण दिसत नाही. मात्र हळूहळू डोकेदुखी, उलट्यांचा त्रास, विस्मरण, न्युरोलॉजिकल समस्या अशी लक्षणं आढळतात. झपाट्याने हा कॅन्सर गंभीर स्वरूप घेत असल्याने त्याची आक्रमकताही अधिक असते.
सीटी स्कॅन, एमआरआय, टिश्यू बायोप्सी अशा चाचण्यांमधून ब्रेन कॅन्सरचे निदान करता येते.
ब्रेन ट्युमरच्या 15 % रूग्णांमध्ये जीबीएम हे ब्रेन कॅन्सरचे स्वरूप आढळते. मेनिनजियोमानंतर आढळणारा हा ब्रेन कॅन्सर आहे. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हा आजार अधिक आढळतो. सरासरी 64 वर्षांनंतर या आजाराचा धोका अधिक असतो.
अभिनेता इरफान खान अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला आला आहे. लवकरच इरफान खान 'ब्लॅकमेल' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे.