डान्सनंतर आता डेटिंग शो जज करणार शिल्पा शेट्टी

अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी कुंद्रा हिअर मी, लव्ह मी या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Apr 18, 2018, 09:24 AM IST
डान्सनंतर आता डेटिंग शो जज करणार शिल्पा शेट्टी title=

मुंबई : अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी कुंद्रा हिअर मी, लव्ह मी या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने मंगळवारी याची घोषणा केली. या डिजिटल सुरुवातीलबाबत शिल्पा म्हणाली, मला वाटते जेव्हा डेटिंगची गोष्ट येते तेव्हा लुक्स महत्त्वाची बाब ठरते.

शिल्पाचा हा पहिला डिजीटल प्रोग्राम आहे. या शो द्वारे शिल्पा डिजीटल प्लॅटफॉर्मवर नवी सुरुवात करतेय. फ्री मँटल मीडिया इंडियाद्वारे याची निर्मिती होतेय. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या डेटमध्ये सर्वाधिक कशाची गरज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

याआधी शिल्पा शेट्टीने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिलेय. या शोमध्ये शिल्पा महिला स्पर्धकांना मदत करणार तसेच त्यांना शिकवणार आहे. स्पर्धकांसाठी कोणता मुलगा चांगला आहे याचे मार्गदर्शन शिल्पा आपल्या स्पर्धकांना करणार आहे.

दरम्यान शोच्या अखेरीस त्या स्पर्धकाला ठरवायचे आहे की त्यांना कोणत्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये रहायचे आहे. शिल्पा या शोच्या काही एपिसोडचे शूटिंग केलेय. तर आणखी काही एपिसोडचे शूटिंग सुरु आहे. तिचा हा शो या वर्षी अॅमेझॉन प्राईमवर सुरु होईल.