श्रेयसच्या घरी चिमुकलीचे आगमन

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झालेय. 

Updated: May 8, 2018, 01:43 PM IST
श्रेयसच्या घरी चिमुकलीचे आगमन title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झालेय. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस आणि दीप्तीच्या बाळाचा जन्म झालाय. खुद्द श्रेयसनेही बातमी दिलीये. मुंबई मिररला याबाबत माहिती देताना श्रेयस म्हणाला, ४ मेला आमच्या घरी इवल्या पावलांनी सुख आलेय. खरंतर १० -१२ दरम्यान बाळाचे आगमन होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही हाँगकाँगला फिरायला गेलो मात्र ४ मे ला सरोगसी करणाऱ्या त्या महिलेला कळा सुरु झाल्याचे समजले आणि आम्ही मागे फिरलो. एअरपोर्टवर आल्याक्षणी आम्हाला मुलगी झाल्याची बातमी समजली. 

त्याला यावेळी सरोगसीच्या पर्याय निवडण्यामागचे कारण विचारले असता तो म्हणाला, काही प्रॉब्लेममुळे हा पर्याय निवडावा लागला. मात्र हा निर्णय योग्य असल्याचे तो सांगतो. 

येत्या १५ मे पासून श्रेयसच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु होतंय. मात्र काही कारणामुळे हे शूटिंग जूनमध्ये सुरु होणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत श्रेयस चांगलाच स्थिरावलाय.