Shreyas Talpade: ओम चिन्हावर मारली लाथ; Video Viral झाल्यावर माफी मागत श्रेयस तळपदे म्हणाला, "मी कधीच..."

Actor Shreyas Talpade Apologises For 2012 Movie Scene: श्रेयसने साकारलेलं पात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत असून अनेकांनी यासंदर्भातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

Updated: Feb 14, 2023, 07:39 PM IST
Shreyas Talpade: ओम चिन्हावर मारली लाथ; Video Viral झाल्यावर माफी मागत श्रेयस तळपदे म्हणाला, "मी कधीच..." title=
shreyas talpade video

Actor Shreyas Talpade Apologises For 2012 Movie Scene: अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या वेगळ्या भूमिका आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. श्रेयस हा मराठीबरोबरच हिंदी प्रेक्षकांमध्येही चांगलाच लोकप्रिय आहे. श्रेयस तळपदे सध्या त्यांच्या आगामी 'एमरजन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र एका जुन्या व्हिडीओमध्ये श्रेयस अडचणीत सापडला आहे. श्रेयसचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवरुन श्रेयसला ट्रोल केलं आहे. सन 2012 मधील हा व्हिडीओ आहे. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या 'कमाल धमाल मालामाल' चित्रपटामधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. श्रेयसनेही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली आहे. या क्लिपमध्ये नेमकं काय आहे आणि घडलंय काय जाणून घेऊयात...

व्हिडीओमध्ये काय?

या व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदेवर चित्रित करण्यात आलेला एक सीन आहे. श्रेयसने साकारलेलं जॉनी नावाचं पात्र ओम या हिंदू धार्मिक चिन्हाचा अपमान करत असल्याचा दावा केला जात आहे. ओम हे हिंदू धर्मामध्ये दिव्य शक्तीचं प्रतिक मानलं जातं. व्हिडीओ पाहून अनेकांनी आमच्या भावना दुखवणारा हा व्हिडीओ आहे, असं म्हणत श्रेयसला ट्रोल केलं आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर श्रेयसने सोशल मीडियावरुन लगेच माफी मागितली आहे. आपण जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत. अशा गोष्टी यानंतर माझ्याकडून होणार नाही, असं श्रेयसने म्हटलं आहे.

श्रेयस काय म्हणाला?

"शुटींग सुरु असताना अनेक गोष्टी सुमोर सुरु असतात. खास करुन जेव्हा आम्ही अॅक्शन सीन शूट करताना दिग्दर्शकांच्या मागण्या, कमी वेळ आणि इतरही अनेक गोष्टींचा विचार एकाच वेळी सुरु असतो. व्हिडीओबद्दल मी इतकं सांगू शकेल ही हा प्रकार नकळतपणे घडला. मी यासाठी सर्वांची माफी मागतो. मी हे पहायला हवं होतं आणि ही गोष्ट दिग्दर्शकांच्या लक्षात आणून घ्यायला हवं होतं. मी कधीच जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही. किंवा असं काही यापुढे करणार नाही," असं श्रेयस म्हणाला.

आता श्रेयसने या प्रकरणासंदर्भात माफी मागितली असून त्यामुळे यावर पडता पडण्याची शक्यता आहे. मात्र 10 वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओमुळे अचानक नकोश्या कारणामुळे श्रेयस चर्चेत आला हे मात्र तितकेच खरे.