वैभव तत्त्ववादी लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवॉकवर

लॅक्मे फॅशन विक हा फॅशन जगतातील झगमगता सोहळा असतो. या सोहळ्यात अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी 'रॉयल' अंदाजामध्ये हजेरी लावतात. पण यंदा या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही समावेश झाला आहे.  

Updated: Feb 5, 2018, 05:26 PM IST
वैभव तत्त्ववादी लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवॉकवर  title=

मुंबई : लॅक्मे फॅशन विक हा फॅशन जगतातील झगमगता सोहळा असतो. या सोहळ्यात अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी 'रॉयल' अंदाजामध्ये हजेरी लावतात. पण यंदा या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही समावेश झाला आहे.  

वैभव तत्त्ववादी रॅम्पवॉकवर 

लॅक्मे फॅशन वीकमध्ये यंदा वैभव शाही अंदाजामध्ये रॅम्प वॉकवर चालताना दिसला. लाल रंगाचे धोतर, कुर्ता आणि डिझायनर उपरणं घेऊन वैभव रॅम्पवॉकवर उतरला होता. 
डिझायनर संजुक्ता यांच्या खास कलेक्शनसाठी वैभव तत्त्ववादी रॅम्पवॉकवर उतरला होता. या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ वैभवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी 

यंदाच्या लॅक्मे फॅशन विकमध्ये पहिल्यांदा अभिनेता शाहीद कपूर त्याची पत्नी मीरासोबत रॅम्पवर उतरला होता. यासोबतच करिना कपूर, तापसी पन्नू, करिना कपूर, सैफ अली खानदेखील रॅम्पवॉकवर उतरले होते.  
सुष्मिताच्या रॉयल आणि ब्रायडल अंदाजानेही लॅक्मे फॅशन विकमध्ये अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.  

वैभवची बॉलिवूड एन्ट्री  

वैभव तत्त्ववादीची सुरूवात मराठी  कलाक्षेत्रातून झाली आहे. मालिका, चित्रपट, मराठी रंगभुमीनंतर वैभव हिंदी सिनेमातही झळकला आहे. संजय लीला भंसाळींच्या ' बाजीराव मस्तानी' चित्रपटामध्ये वैभव झळकला होता. त्यानंतर मणिकर्णिका या आगामी चित्रपटातही वैभव झळकणार आहे.