माकडाच्या मुखवट्यावर अभिनेत्रीचा 'मुकाबला' व्हायरल

या व्हिडिओत अभिनेत्री  माकडाचा मुखवटा घालून साडीवर नाचताना दिसत आहे. 

Updated: Oct 4, 2018, 08:21 AM IST
माकडाच्या मुखवट्यावर अभिनेत्रीचा 'मुकाबला' व्हायरल title=

नवी दिल्ली : माकडाच्या मुखवटा घालून अभिनेत्रीने केलेला डान्स हजारो लोकांच्या पसंतीच पडत आहे. सोशल मीडियात हा डान्स व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनलायं. या व्हिडिओत अभिनेत्री  माकडाचा मुखवटा घालून साडीवर नाचताना दिसत आहे. माकडाच्या चेहऱ्यामागे जबरदस्त डान्स करणारी अभिनेत्री अदा शर्मा आहे.

गाण्याचीच चर्चा  

 
 
 
 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

 प्रभुदेवाचं प्रसिद्ध गाणं 'मुकाबला' वर अदा शर्मा थिरकताना दिसत आहे. हा डान्स तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू शेअर केलायं. डान्स झाल्यावर  माकडाचा मास्क काढल्यानंतर तिचा हसणारा चेहरा दिसून येतो. माझी बोट हळूहळू ठिक होत आहेत..तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद..असे तिने पोस्टवर लिहिलंय. 

बोटांचा त्रास विसरले 

 'इथं लंडनमध्ये एका खास व्यक्तीने माकडाचं मास्क मला गिफ्ट केलं. मला बोटांच्या दुखापतीचा त्रास होत होता. हे विसरण्यासाठी मी डान्स करण्याचा विचार केला आणि ही आयडीया कामी आल्याचे'ही अदा सांगते.

आगामी दोन सिनेमा  

 हे माझे फेव्हरेट असलेल्या प्रभुदेवा यांच गाणं आहे. त्यांच्यासोबत काम करायला मिळालं हे माझं भाग्य आहे पण हे त्या सिनेमातलं गाणं नाहीयं. 2008 मध्ये आलेल्या '1920' सिनेमातून अदा शर्माने बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली. आगामी काळात ती 'चार्ली चाप्लीन 3' आणि 'कमांडो 2' या सिनेमात दिसणार आहे.