अभिनेत्री ऐश्वर्या आई होणार, सोशल मीडियावरून शेअर केली चाहत्यांसाठी गुड न्यूज!

नुकतीच अशी बातमी समोर येतेय की, अभिनेत्री ऐश्वर्या प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर या एक्ट्रेसचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Updated: Mar 19, 2024, 07:33 PM IST
अभिनेत्री ऐश्वर्या आई होणार, सोशल मीडियावरून शेअर केली चाहत्यांसाठी गुड न्यूज! title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या शर्माच्या चाहत्यांमध्ये तेव्हा चर्चांना उधाण आलं जेव्हा डान्स दीवानेच्या सेटवर अभिनेत्रीला चक्कर आली होती. सगळेच अभिनेत्रीच्या तब्येतीला घेवून हैराण होते. मात्र नुकतंच ऐश्वर्याने पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की, आता ती ठिक आहे आणि चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता केली यासाठी तिने सगळ्यांना थँक्यू म्हणत आभार मानले आहेत. मात्र आता अभिनेत्रीबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जातंय की, ही अभिनेत्री प्रेग्नंट आहे.

अभिनेत्री खरंच प्रेग्नंय आहे का? 
बॉलिवू लाईफच्या रिपोर्टनुसार असा चान्स आहे की, ऐश्वर्या आणि नील भट्ट पालक होणार आहेत. दोघंही एकमेकांसोबत खूप चांगला टाईम स्पेंड करत आहेत. सध्या दोघं पब्लिकमध्ये हे आणू ईच्छित नाहीत आणि योग्य वेळेची वाट पाहत आहे अनाउंसमेंट करण्यासाठी. 

अभिनेत्रीला सोर्सने सांगितलं चूक
खरंतर अभिनेत्रीच्या एका जवळच्या सोर्सने या बातमीला अफवा म्हटलं आहे. खरंतर याआधी पण अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची बातमी समोर आली होती. तेव्हा अभिनेत्रीने सांगितलं होतं की, ती स्वत: तिचा परिवार वाढवू ईच्छिते आणि तिची बकेट लिस्टदेखील आहे. मात्र, ऐश्वर्याने या बातम्यांवर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे आणि ती स्वतःच यामगचं सत्य सांगितलं आहे. अभिनेत्री अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी स्वतःबद्दलच्या बातम्यांवर लगेच प्रतिक्रिया देते.

“तिसऱ्यांदा मी हे ओरडून सांगत आहे कारण सध्या मला मेसेजेस मिळवण्याचा आजार आहे. कोणतिही धारणा बनवणं  थांबवा, मी एक माणूस आहे कधीकधी माझा बीपी कमी होतो आणि एफवाईआई. माझा बीपी ड्रॉप 60-80 होता, त्यामुळे मला सेटवर चक्कर आली. मी गरोदर नाहीये. विशेषत: हा मॅसेज मीडियासाठी आहे, आत्ताच थांबवा धन्यवाद.”

गुम है किसी के प्यार मेमधून ऐश्वर्या घरा-घरात पोहचली.  यानंतर अभिनेत्री खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती ज्यामध्ये ती जबरदस्त स्टंट करताना दिसली. तिचे स्टंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. इतकंच नाही तर तिच्या चाहत्यांना तिच विनर होणार असंही वाटलं होतं. यानंतर या शोदरम्यान ऐश्वर्याला बिग बॉसची ऑफर मिळाली होती तेव्हा पुन्हा एकदा ऐश्वर्या पती नील भट्टसोबत बिग बॉस 17 मध्ये आली होती. मात्र ती या शोमध्ये फार काळ टिकू शकली नाही.