लग्नानंतर आलियाने व्यक्त केली भीती..रणबीर मात्र भलताच खूश

आलिया भट्टने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती नर्व्हस दिसत आहे, चाहते मात्र भरभरून अभिनंदन करत आहेत.

Updated: May 19, 2022, 12:54 PM IST
लग्नानंतर आलियाने व्यक्त केली भीती..रणबीर मात्र भलताच खूश title=

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला एक महिना झाला, तरी त्यांच्या चर्चा रोज होत असतात.यातच आता आलियाने आणखी एक मोठी गूडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर आलियाने ही बातमी शेअर केली आहे. मात्र तरीही आपण नर्व्हस असल्याचं आलियाने म्हटलंय

आलिया भट्टने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं आहे की, मी माझा पहिला हॉलिवूड चित्रपट शूट करणार आहे. मी पुन्हा नवखी झालीय असं वाटतंय. मी खूप घाबरली आहे. आलियाच्या या पोस्टवर लोक कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पंख पसरवल्यानंतर आता हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवण्याल आलिया सज्ज आहे. आलियाला हॉलिवूडचा प्रोजेक्ट मिळाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना मिळाली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता आलियाने स्वतः ही बातमी दिलीय की ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी जात आहे.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, आलियाकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याशिवाय आलिया रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्येही दिसणार आहे. आलिया भट्ट तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'डार्लिंग्स' या चित्रपटातही तिचे अभिनय कौशल्य दाखवणार आहे.