गौतमी देशपांडेची मोठी फसवणूक; कामाचे पैसे न मिळाल्याने संतापली अभिनेत्री

अनेकदा अनेक कलाकार त्यांच्या कामाच्या मोबादल्यातले पैसे नं मिळाल्यामुळे मौन सोडतात आणि सोशल मीडियावर व्यक्त होतात. नुकताच असा काहीसा प्रकार अभिनेत्री गौतमी देशपांडेसोबत घडला आहे. 

Updated: Aug 25, 2023, 05:53 PM IST
 गौतमी देशपांडेची मोठी फसवणूक; कामाचे पैसे न मिळाल्याने संतापली अभिनेत्री title=

मुंबई : अनेकदा अनेक कलाकार त्यांच्या कामाच्या मोबादल्यातले पैसे नं मिळाल्यामुळे मौन सोडतात आणि सोशल मीडियावर व्यक्त होतात. नुकताच असा काहीसा प्रकार अभिनेत्री गौतमी देशपांडेसोबत घडला आहे. सोशल मीडियावर या संबधातली एक पोस्ट शेअर गौतमीने संताप व्यक्त केला आहे. गौतमीने तिचं काम करुनही तिला तिच्या कामाचा मोबादला मिळाला नाही आणि म्हणूनच अभिनेत्रीने ही पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

काय आहे अभिनेत्रीची पोस्ट
गौतमी देशपाडेंने इन्स्टाग्रामवर मेसेजचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. कामाचं मानधन वेळेवर न मिळाल्याने अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये गौतमीने समोरच्या व्यक्तीला ''पैसे ट्रान्सफर केले का?' असा मेसेज केला. यानंतर गौतमीला 'थांबा, चेक करते' असं उत्तर समोरच्या व्यक्तीने दिलं. यानंतर  पुढचे दोन दिवस उलटूनही पैसे न मिळाल्याने गौतमीने पुन्हा मेसेज केला, ''मी तुम्हाला संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला एखाद्या गोष्टीसाठी एवढ्या वेळा पाठपुरावा करावा लागतो हे खरोखरचं अस्वीकार्य आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा.'' असं गौतमीने मॅसेजमध्ये लिहिलं.

गौतमीने पुढच्या मेसेजमध्ये, ''तुम्ही उत्तर पण देऊ शकत नाही का? जर, मला उत्तर देण्याचं सौजन्य तुमच्यामध्ये नसेल तर या सगळा प्रकार मी इन्स्टाग्रामवर शेअर करणार आहे.''   असं लिहित, अशी ताकीद दिली होती. गौतमीला समोरून काहीच उत्तर तिला मिळालं नाही आणि हा सगळा प्रकार अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला.

''जेव्हा पैशांचा प्रश्न येतो…तेव्हा लोक असं वागतात. मला या क्षणी खरंच खूप वाईट वाटतंय. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला असा मिळतो आणि स्वत:च्या पैशांसाठी पाठपुरावा करावा लागतो.''  अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केली आहे.

सध्या गौतमीची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.  माझा होशील ना या मालिकेतून गौतमी घरा-घरांत पोहचली. याचबरोबर अभिनेत्री गायिका देखील आहे. सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची गौतमी धाकटी बहिण आहे. सोशल मीडियावर गौतमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.