अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

 भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. 

Updated: Oct 3, 2021, 03:04 PM IST
अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता title=

शिमला : हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत उमेदवार असू शकते. भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका वर्गाला मंडी सीटवरून कंगना रानौतला तिकीट द्यायचे आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वातही उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, कंगनाने निवडणूक लढण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली नाही.

कंगना रनौत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावची आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. मंडीबरोबरच हिमाचलमधील फतेहपूर, जुबल कोथकाई आणि आर्की विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या वर्षी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर आर्की जागा रिक्त आहे. उर्वरित दोन जागाही येथे विजयी झालेल्या उमेदवारांच्या मृत्यूनंतर रिक्त झाल्या आहेत.