‘पद्मावती’ वाद हा सगळा राजकीय ड्रामा - रवीना टंडन

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’चा वाद अजूनही सुरु आहे. करणी सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे.

Updated: Dec 2, 2017, 07:56 PM IST
‘पद्मावती’ वाद हा सगळा राजकीय ड्रामा - रवीना टंडन title=

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’चा वाद अजूनही सुरु आहे. करणी सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे. दुसरीकडे अनेक कलाकार या सिनेमाच्या बाजूने उभे आहेत. अशात आता अभिनेत्री रवीना टंडन हिने आपलं मत मांडलं आहे.

‘हा राजकीय ड्रामा’

एका टिव्ही कार्यक्रमात रवीन टंडन म्हणाली की, ‘पद्मावती वाद हा राजकीय ड्रामा आहे. मला असं वाटतं की, काही गोष्टींचा काळ असतो. निवडणुका संपू द्या, सगळं काही ठिक होईल’.

रवीनाची राजा आणि महाराजांवरही टीका

तसेच रवीनाने राजा आणि महाराजांवरही निशाणा साधला आहे. ती म्हणाली की, ‘पद्मावतीमध्ये त्या जमान्यात काय होत होतं हे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आपले सगळेच राजा-महाराजाही काही चांगले नव्हते. ते काही गंगेत न्हाऊन येत नव्हते’.

सिने इंडस्ट्री एकत्र

ती म्हणाली, ‘जेव्हा काही अडचण येते तेव्हा सिने इंडस्ट्री एकत्र येते. पद्मावतीवरूनही आम्ही एकत्र आहोत. फिल्ममेकर्स विरोधात उभे राहणे हे काही नवीन नाहीये. याआधीही मजरूह सुल्तानपुरी यांना १ वर्ष ६ महिन्यांचा तुरूंगवास झाला होता. त्यांनी एक कविता लिहिली होती’.