आलिया- रणबीरनंतर आता बॉलीवूडची 'ही' जोडी अडकणार लग्नबंधनात

या प्रवाहात आता बॉलीवूडचे सेलिब्रेटी काही मागे राहिलेले नाहीत. 

Updated: Aug 5, 2022, 09:47 AM IST
आलिया- रणबीरनंतर आता बॉलीवूडची 'ही' जोडी अडकणार लग्नबंधनात title=

Richa Chaddha and Ali Fazal Marriage:  अभिनेत्री आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि कतरिना कैफ-विकी कौशल यांच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हे कपल यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग ट्रेण्ड सुरू आहे. कतरिना कैफ, आलिया भट्ट पासून ते मौनी रॉय आणि अंकिता लोखंडेपर्यंत सगळीकडेच लग्नसभारंभांची धुम पाहायला मिळाली. त्यामुळे या प्रवाहात आता बॉलीवूडचे सेलिब्रेटी काही मागे राहिलेले नाहीत. 

नुकत्याच आलेल्या माहितीनूसार  अली फजल आणि रिचा चढ्ढा हे कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यापुर्वीही रिचा आणि अली फजलच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात येत होते. पण आता आलेल्या माहितीनूसार हे दोघं सप्टेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 

कतरिना, दीपिकाप्रमाणे या दोघांचे लग्न कुठेतरी परदेशात होईल की काय अशी शक्यता आहे परंतु समोर आलेल्या माहितीनूसार ही दोघं भारतातच लग्न करण्याची शक्यता आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस लग्नबंधनात अडकू शकतात आणि या दोघांचे लग्न मुंबईत किंवा दिल्लीत होऊ शकते. या जोडप्याच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. अली फजल आणि ऋचा चढ्ढा 2021 मध्ये लग्न करणार होते पण लॉकडाऊनमुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यानंतर मार्च 2022 मध्ये त्यांच्या लग्नाची बातमी पुन्हा चर्चेत आली होती पण तरीही काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नव्हते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिचा चढ्ढा आणि अली फजल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 7 वर्षे डेट केल्यानंतर अलीने रिचाला लग्नासाठी प्रपोज केले. या दोघांनी आतापर्यंत 'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स' या दोन चित्रपटात काम केले आहे.एरव्ही ते दोघं बॉलीवूड पार्टीपासून ते अवॉर्ड शोपर्यंत सदैव एकत्र असतात.