समंथावर उपाशी पोटी झोपण्याची वेळ, का ओढावली इतकी वाईट परिस्थिती?

पाहून डोळ्यात पाणी येईल 

Updated: Aug 10, 2022, 11:01 AM IST
समंथावर उपाशी पोटी झोपण्याची वेळ, का ओढावली इतकी वाईट परिस्थिती?  title=
Actress Samantha Ruth Prabhu slept hungry in her struggling days

मुंबई : 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटातील आयटम साँग्स, 'द फॅमिली मॅन 2' मधील दमदार परफॉर्मन्स देणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu ) हल्लीच Koffee With Karan 7 या टॉक शोमध्येही सहभागी होताना दिसली. दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळा प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या समंथाची विविधभाषी प्रेक्षकांमध्येही चर्चा. पण, चर्चेचं कारण मात्र वेगळं. 

सुपरस्टार नागार्जुन यांच्या मुलासोबत समंथानं लग्न केलं होतं. जवळपास 4 वर्षांच्या संसारानंतर नागा चैतन्यसोबतच्या (Naga chaitanya) नात्यात दुरावा आल्यामुळं त्याच्यासोबतच्या नात्याला तिनंही पूर्णविराम दिला. समंथा चर्चेत येण्यासाठी हे एक मोठं कारण ठरलं. 

एकिकडे खासगी आयुष्यात वावटळ आलेलं असतानाच दुसरीकडे समंथा मात्र कामाच्या व्यापात स्वत:ला झोकून देताना दिसली. त्यातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, जिथे ती आपण जवळपास दोन महिने एक वेळचंच जेवण जेवू इतकी वेळ आल्याचं सांगताना दिसली. 

आर्थिक अडचणींविषयी बोलतानाचा तिचा हा व्हिडीओ आताचा आहे, तिच्यावर ही वेळ का आली?, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर थांबा. कारण, हा व्हिडीओ आहे 2017 मधील. एका विद्यापीठामध्ये प्रमुख उपस्थिती लावणाऱ्या समंथानं त्यावेळी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सर्वांपुढे ठेवली होती. 

काय म्हणाली होती समंथा? 
'मी जेव्हा शिकत होते, तेव्हा आई- वडिलांनी मला चिकाटीनं शिकून मोठं होण्यास सांगितलं होतं. मी मेहनतीनं शिकले, दहावी, बारावी आणि महाविद्यालयात मी अग्रस्थानी आले. पण, त्यानंतर मला पुढे शिकायचं होतं. पालकांना तितका आर्थिक भार घेणं शक्य नव्हतं. माझी स्वप्न नव्हती, भविष्य नव्हतं... काहीच नव्हतं', असं समंथा म्हणाली होती. 

स्वप्न बघा.... तुम्हाला जे काही मिळवायचंय त्याची स्वप्न बघा आणि ती साध्य करा. हे सर्व कठीण नक्कीच असेल पण, तुम्ही पुढे जायला शिकाल, असं ती विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणत होती. 

तेव्हाच समंथानं आपल्या कार्यक्षेत्रातील सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला. मी दिवसभरात फक्त एकदाच जेवत होते (आर्थिक चणचण असल्यामुळे), जवळपास दोन महिन्यांसाठी हे सुरु होतं. मी सगळी कामं केली.... आज मी इथवर पोहोचलेय, असं सांगताना आपण लांबचा पल्ला पार केल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. 

एक अभिनेत्री असण्यासोबतच एका सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं आपण नेमका कोणत्या परिस्थितीचा सामना केला, हे सांगताना समंथा त्यावेळी काहीशी भावनिकही झाली होती.