अभिनेत्रीने 100 पेक्षा जास्त मुलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, नंतर त्यांच्यासोबत...

कोण आहे ती सुंदर अभिनेत्री?  

Updated: Jan 15, 2022, 08:42 AM IST
अभिनेत्रीने 100 पेक्षा जास्त मुलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, नंतर त्यांच्यासोबत... title=

मुंबई : मुलगी सुंदर असेल तर अनेकांच्या नजरा तिच्यावर भाळतात. असंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतही झालं आहे. या अभिनेत्रीने एक दोन नाही तर चक्क 100 पेक्षा जास्त मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीनसून  'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया आहे. दिसायला प्रचंड सुंदर. डोळ्यांचं अप्रतिम तेज... अशा मुलीच्या प्रेमात कोणीही पडेल. 

मालिकेत कायम साध्या आणि सभ्य भूमिकेत असलेली सोनारिका खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 29 वर्षीय सोनारिकाने आतापर्यंत 137 हून अधिक मुलांचे प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला होता की तिने आतापर्यंत 137 पेक्षा जास्त मुलांना लग्नाला नकार दिला. हे वय लग्न करण्याचे नसून काम करण्याचे आहे, असे सोनारिकाचं मत आहे. 

मालिकेत ठसा उमटवल्यानंतर तिला इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवायचे आहे. टीव्ही मालिकांनंतर आता सोनारिकाला बॉलिवूडमध्ये झलक दाखवायची आहे

सोनारिका भदोरिया ही प्रसिद्ध तेलुगु स्टार आहे. तिने 'जादुगडू', 'स्पीदुन्नोडू', 'एदो रख आओ राख' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवों के देव महादेव'मध्‍ये पार्वतीच्या भूमिकेसाठी अजूनही तिला ओळखली जातं.